घरक्रीडाIPL 2021 : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अखेर भारतातून बाहेर पडले; ‘या’ ठिकाणी जाऊन थांबणार

IPL 2021 : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अखेर भारतातून बाहेर पडले; ‘या’ ठिकाणी जाऊन थांबणार

Subscribe

बीसीसीआयने जबाबदारी घेत उचललेल्या पावलांबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम नुकताच स्थगित करण्यात आला. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी झालेले भारतीय, तसेच परदेशी खेळाडू आपापल्या घरी परत जात आहेत. मात्र, भारतामध्ये कोरोनाचा धोका वाढत असल्याने ऑस्ट्रेलियाने १५ मेपर्यंत आपली हवाई वाहतूक स्थगित केली आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळणारे ऑस्ट्रेलियन खेळाडू मायदेशी कसे परतणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, बीसीसीआयने या खेळाडूंना आपल्या मायदेशी पाठवण्याची व्यवस्था केली. आयपीएलमध्ये सहभागी झालेले ऑस्ट्रेलियन खेळाडू, सपोर्ट स्टाफ सदस्य, पंच आणि समालोचक गुरुवारी भारतातून मालदीवसाठी रवाना झाले. याबाबतची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ट्विटरवरून दिली.

बीसीसीआयचे आभार

क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनला बीसीसीआयचे आभार मानायचे आहेत. आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय झाल्यानंतर दोन दिवसांतच त्यांनी या स्पर्धेत सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियन व्यक्तींना मालदीवला पाठवले आहे. त्यांनी जबाबदारी घेत उचललेल्या पावलांबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले.

- Advertisement -

मालदीवला जाऊन थांबणार

खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, पंच आणि समालोचक असे एकूण ४० ऑस्ट्रेलियन यंदा आयपीएलमध्ये सहभागी होते. त्यांना आधी चार्टर्ड विमानाने भारतातून मालदीव येथे नेण्यात आले आहे. तेथून ऑस्ट्रेलियन सरकारची परवानगी मिळाल्यावर ते दुसऱ्या विमानाने ऑस्ट्रेलियात दाखल होतील. बीसीसीआयने या सर्वांना ऑस्ट्रेलियात परत पाठवण्याची आधीच जबाबदारी घेतली होती.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -