घरताज्या घडामोडीमटणवाला चाचा म्हणून आयर्न मॅनची पोलीस ठाण्यात एंट्री, फोटो व्हायरल

मटणवाला चाचा म्हणून आयर्न मॅनची पोलीस ठाण्यात एंट्री, फोटो व्हायरल

Subscribe

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांप्रमाणे मृतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला. दरम्यान मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या पोलिसांचा रुद्र अवतार पाहायला मिळला. पण यावेळेस पोलिसांनी थोडे नमते घेतले असून नम्र पणाने नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगत आहे. पण पोलीस नेमके नागरिकांशी कसे वागतात हे पाहण्यासाठी चक्क पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश हे मटणवाले चाचा झाले होते. त्यांनी पिंपरीमधील काही पोलिसांची परीक्षा घेतली. ती नेमकी कशी ते पाहा…

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश हे नेहमीच त्यांच्या वेगळ्या स्टाईलने चर्चेत असतात. त्याचीच प्रचित आज पुन्हा एकदा झाली आहे. यावेळेस ते थेट वेशांतर करून पोलीस स्टेशनमध्ये पाहणी करण्यासाठी पोहोचले. पोलीस नागरिकांशी सौजन्याने वागतात का? हे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी तपासले आहे. आपण देखील ओळखूही शकत नाही असा अवतार करून कृष्णप्रकाश पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते.

- Advertisement -

काल (बुधवार) मध्यरात्री १२ वाजता कृष्णप्रकाश वेशांतर केले. एका मुस्लिम व्यक्तीच्या वेशात ते पिंपरी शहरात वावरले. यावेळी त्यांनी पोलिसांची परीक्षा घेतली असून ते तीन पोलीस स्टेशनमध्ये गेले. पिंपरी, वाकड आणि हिंजवटी पोलीस स्टेशनमध्ये आणि जिथे नाकाबंदी लावण्यात आली आहे तिथे कृष्णप्रकाश गेले. काही ठिकाणी जावून त्यांनी पाहणी केली. यावेळेस हिंजवटी आणि वाकड पोलीस स्टेशनमधील पोलिसांचा व्यवहार त्यांना योग्य वाटला. पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये असे काही चित्र दिसून आले नाही. त्यांनी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये सांगितले की, एका ठिकाणी रुग्णवाहिकेची गरज आहे, पण चालक अधिकचे पैसे मागतोय. यावेळेस पिंपरी पोलिसांनी हवी ती मदत केली नाही. दरम्यान पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आदेश काढला होता की, जे अधिकचे पैसे मागतील त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केले जावे. त्यामुळे पिंपरी पोलिसांनी तातडीने त्या रुग्णवाहिका चालकावर कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु तशाप्रकारची कारवाई केली गेली नाही. तसेच जिथे नाकाबंदी आहे, तिथे कोण कुठे जातंय हे चेकं करणे आवश्यक असते. पण एका नाकाबंदीच्या ठिकाणी पोलीस मोबाईलवर गेम खेळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे कृष्णप्रकाश यांच्या परिक्षेत काही पोलीस पास झाले तर काही पोलीस नापास झाले आहेत. त्यामुळे आता जे नापास झाले आहेत, त्यांना मेमो देणार असल्याचे कृष्णप्रकाश यांनी स्पष्ट केलं आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -