घरक्रीडाIPL 2021 : मुंबई इंडियन्सची फलंदाजी; जयंत यादवला संधी 

IPL 2021 : मुंबई इंडियन्सची फलंदाजी; जयंत यादवला संधी 

Subscribe

वेगवान गोलंदाज अ‍ॅडम मिलनेच्या जागी ऑफस्पिनर जयंत यादवला मुंबईने संधी दिली आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या तुल्यबळ संघांमध्ये सामना होत आहे. चेन्नईत धावांचा पाठलाग करणे अवघड जात असल्याने या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबईच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज अ‍ॅडम मिलनेच्या जागी ऑफस्पिनर जयंत यादवला मुंबईने संधी दिली आहे. खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याने आम्ही अतिरिक्त फिरकीपटू खेळवत असल्याचे मुंबईचा कर्णधार रोहितने सांगितले. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबईकडून क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्ट हे केवळ तीन परदेशी खेळाडू खेळणार आहेत.

हेटमायर, मिश्राचे पुनरागमन  

चेन्नईत मुंबईचा हा चौथा सामना असून दिल्लीचा पहिलाच सामना आहे. दिल्लीलाही प्रथम फलंदाजी करायला आवडली असती असे नाणेफेकीच्या वेळी कर्णधार रिषभ पंत म्हणाला. दिल्लीने या सामन्यासाठी संघात दोन बदल केले असून क्रिस वोक्स आणि मेरीवाला यांच्या जागी शिमरॉन हेटमायर आणि अमित मिश्रा यांना संधी देण्यात आली आहे. मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघांनी आतापर्यंत आपले तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत.

- Advertisement -

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -