घरमनोरंजन'तूफान' मतभेदाची नव्हे तर प्रेमकथा - राकेश ओमप्रकाश मेहरा

‘तूफान’ मतभेदाची नव्हे तर प्रेमकथा – राकेश ओमप्रकाश मेहरा

Subscribe

तूफ़ानमध्ये महिला नायिकेची देखील प्रमुख भूमिका आहे. आपण मागील दशकात नारी शक्तिचा उदय बघितला आहे, मात्र अजूनही एक मोठे अंतर कापणे बाकी आहे.

अभिनेता फरहान अख्तर, मृणाल ठाकुर, परेश रावल अशा प्रतिभाशाली कलाकारांची वर्णी असणारा ‘तूफ़ान’ हा चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा बी टाऊन मध्ये रंगत आहे. ‘तूफान’ एक वैश्विक कथा असणारा चित्रपट आहे. विश्व सिनेमाच्या रुपात एक अतिशय समर्पक आणि व्यापक कथानक आहे.चित्रपटाबद्दल बोलताना, निर्देशक राकेश ओमप्रकाश मेहरा म्हणतात की, ”तूफ़ान ही एक तळागाळातील माणसाची कथा आहे आणि सर्वात महत्वपूर्ण गोष्ट ही आहे ‘तूफान’ चित्रपट मतभेद निर्माण न करता प्रेम पसरवणारी कथा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

- Advertisement -

एक्सेल एंटरटेनमेंट आणि आरओएमपी पिक्चर्सच्या सहयोगाने अमेझॉनद्वारे प्रस्तुत राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा आगामी चित्रपट ‘तूफ़ान’ यावेळी देशातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. शिवाय, निर्मात्यांना हा विश्वास आहे, कि हा स्पोर्ट्स ड्रामा जगभरच्या प्रेक्षकांना मोठ्या संख्येने आपल्याकडे आकर्षित करेल आणि याचे श्रेय चित्रपटाचा विषय आणि शेवटी दिल्या जाणाऱ्या संदेशात आहे. प्रत्येक देश, मग तो श्रीमंत असो किंवा गरीब, कोणत्या न कोणत्या समस्येने ग्रासला आहे. आणि देशातील प्रत्येक व्यक्तीसमोर दुखा:चा डोंगर आहेत मनात असंख्य घाव,वळ आहेत. तूफान चित्रपटात दाखवण्यात आलेली कथा त्या घावांवर सुखदायक मलम लावणारी आहे. जगातल्या कुठल्याही भागातली कोणतीही व्यक्ती, स्वतःला चित्रपटाच्या कथेशी जोडून घेऊ शकेल.” यासोबतच त्यांनी म्हटले की,”मुष्टीयुद्ध हे जगातील सर्वात प्रसिद्ध खेळांपैकी एक आहे- अमेरिका, दक्षिण अमेरिका, रशिया आणि यूरोप इत्यादि सर्व मुष्टियुद्धासाठी प्रसिद्ध देश आहेत… आणि म्हणूनच जगभरातील लोक चित्रपटासोबत स्वतःला जोडून घेऊ शकतील.”

लोकांच्या अदम्य भावनेवर प्रकाश टाकणे आणि मुष्टियुद्धासारख्या वैश्विक खेळाचा विषय निवडण्या व्यतिरिक्त, राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी हे देखील सांगितले की हा चित्रपट महिला सक्षमीकरणावर देखील भाष्य करतो.”तूफ़ानमध्ये महिला नायिकेची देखील प्रमुख भूमिका आहे. आपण मागील दशकात नारी शक्तिचा उदय बघितला आहे, मात्र अजूनही एक मोठे अंतर कापणे बाकी आहे. आपल्याला आपल्या विश्वासावर प्रश्नचिन्ह लावणे बंद करावे लागेल की आपण स्त्रियांकडे कसे पाहतो आणि मृणालची व्यक्तिरेखा अनन्या अशीच आहे. विशेष करून महिला याच्याशी स्वतःला जोडून घेऊ शकतील.”

- Advertisement -

‘तूफ़ान’, रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांच्याद्वारे निर्मित असून या प्रेरणादायक स्पोर्ट्स ड्रामाचा प्रीमियर अमेझॉन प्राईम व्हिडीओवर २१ मे २०२१ला होणार आहे.


हे हि वाचा – ‘महाभारत’ चित्रपटात शाहिद कपूरची वर्णी साकारणार ही भूमिका

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -