घरक्रीडाIPL 2022 CSK vs KKR : धोनीमुळे तणावात होतो, विजयानंतर अय्यरचा मोठा...

IPL 2022 CSK vs KKR : धोनीमुळे तणावात होतो, विजयानंतर अय्यरचा मोठा खुलासा

Subscribe

आयपीएलच्या १५ व्या हंगामाची (IPL 2022 CSK vs KKR ) सुरुवात शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या सामन्याने झाली. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्ज (CSK vs KKR) वर ६ गडी राखून विजय मिळवला. विजयानंतर कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) बोलताना चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीमुळे (MS Dhoni) तणावात होतो, असे म्हणाला. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला निर्धारित २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात केवळ १३१ धावा करता आल्या, प्रत्युत्तरात कोलकाताने १८.३ षटकात केवळ ४ गडी गमावून लक्ष्य गाठले.

सामन्यानंतर श्रेयस म्हणाला, सुरुवातीपासून संघ व्यवस्थापन, फ्रँचायझी खूप उत्सुक आहेत. आम्हाला ही लय यापुढेही कायम ठेवायची आहे. तो म्हणाला की चेन्नईच्या फलंदाजीदरम्यान, शेवटच्या षटकांमध्ये दव पडल्यामुळे गोलंदाजांना अडचणी येत होत्या आणि महेंद्रसिंग धोनी क्रिझवर उपस्थित असल्यामुळे थोडा ताण होता. श्रेयस म्हणाला, जेव्हाही धोनी फलंदाजी करतो तेव्हा तुम्ही (विरोधी संघ) तणावात असता. शेवटच्या तीन षटकांमध्ये सामना त्यांच्या दिशेने जात होता, गोलंदाजांना चेंडू पकडणे कठीण जात होते, हे मला माहीत होते.

- Advertisement -

दरम्यान, अनुभवी गोलंदाज उमेश यादवने सामन्यात चार षटकांत २० धावा देत दोन बळी घेतले. कर्णधाराने त्याचे कौतुक केले आणि सराव सत्रादरम्यान तो खूप मेहनत घेत असल्याचे सांगितले. “उमेश यादव नेट्समध्ये आणि सराव सत्रात खूप मेहनत घेत होता आणि आज त्याला चांगली कामगिरी करताना पाहून आनंद झाल्याचे अय्यर म्हणाला.

- Advertisement -

दोन वर्षांनंतर सामनावीराचा किताब मिळाल्याने उमेश खुद्द खूश दिसत होता. तो म्हणाला, अशी संधी अधूनमधून येते. माझ्यासाठी ही (मॅन ऑफ द मॅच) संधी दोन वर्षांनंतर आली आहे. पॉवर प्लेमध्ये विकेट्स घेणे महत्त्वाचे होते आणि मला आनंद आहे की संघाने दिलेली भूमिका त्याला बजावता आली.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -