घरक्रीडाIPL 2024 : पंजाब प्लेऑफच्या शर्यतीत, तर चेन्नईचा आयपीएलमधील पाचवा पराभव

IPL 2024 : पंजाब प्लेऑफच्या शर्यतीत, तर चेन्नईचा आयपीएलमधील पाचवा पराभव

Subscribe

चेन्नईचा 7 विकेट्सने पराभव करत पंजाब किंग्जने प्लेऑफच्या शर्यतीत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

नवी दिल्ली : आयपीएल 2024 चा 49 वा सामना बुधवारी (1 मे) चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात चांगली कामगिरी करत पंजाब किंग्जने चौथा विजय मिळवत प्लेऑफच्या शर्यतीत आपले आव्हान कायम ठेवले आहे, तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जला यंदाचा हंगामात पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईचा 7 विकेट्सने पराभव करत पंजाब किंग्ज गुजरात टायटन्सला मागे टाकत गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहचली आहे. (IPL 2024 Punjab kings playoff race Chennai super kings fifth defeat)

एमए चिदंबरम स्टेडियमवर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज कर्णधार ऋतुराज गायकवाड जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. त्याने 48 चेंडूंचा सामना करताना 129.17 च्या स्ट्राइक रेटने 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 62 धावांची शानदार खेळी केली. ही त्याची संघासाठी सर्वाेच्च धावसंख्या होती. ऋतुराज गायकवाड व्यतिरिक्त अजिंक्य रहाणेने 24 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 29 धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या समीर रिझवीने 23 चेंडूत 21 धावा केल्या. पंजाबच्या घातक गोलंदाजीसमोर चेन्नईने निर्धारीत 20 षटकात 7 विकेट गमावत 162 धावा केल्या. पंजाबकडून राहुल चहर आणि हरप्रीत ब्रार हे यशस्वी गोलंदाज ठरले. चहरने 4 षटकात 16 धावा देत 2 विकेट घेतल्या, तर ब्रारने 4 षटकात 17 धावा देत 2 विकेट घेतल्या, या दोन्ही गोलंदाजांव्यतिरिक्त अर्शदीप सिंग आणि कागिसो रबाडा यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

- Advertisement -

चेन्नईकडून मिळालेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर जॉनी बेअरस्टोने 30 चेंडूत 153.33 च्या स्ट्राईक रेटने 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या रिले रुसोने 23 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 43 धावांची खेळी केली. या दोन्ही फलंदाजांव्यतिरिक्त मधल्या फळीत कर्णधार सॅम कुरन 26 आणि शशांक सिंगने 25 धावांची नाबाद खेळी करत पंजाब किंग्जला विजय मिळवून दिला. पंजाबाने चेन्नईकडून मिळालेल्या 163 धावांचे लक्ष्य 17.5 षटकांत 3 विकेट गमावत पूर्ण केले. चेन्नईकडून शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लीसन आणि शिवम दुबे यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. तर या सामन्यात पंजाबचा गोलंदाज हरप्रीत ब्रारची ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -