घरदेश-विदेशLok Sabha 2024 : मोदी हा सत्तेसाठी वखवखलेला भटकता आत्मा, ठाकरे गटाचा...

Lok Sabha 2024 : मोदी हा सत्तेसाठी वखवखलेला भटकता आत्मा, ठाकरे गटाचा घणाघात

Subscribe

मोदी - अमित शहा यांनी सध्या महाराष्ट्रातच ठाण मांडले आहे. त्यांचे आत्मे महाराष्ट्रात वखवखल्यासारखे फिरत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगेससारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष फोडूनही मोदी यांचा आत्मा शांत झाला नाही, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हा सत्तेसाठी वखवखलेला भटकता आत्मा आहे. ही वखवख आज सर्वच पातळीवर दिसत आहे. शिवसेना-फडणवीस गटाचे नेते मिंधे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) म्हणतात, ‘20-20 तास काम करणारे मोदी यांचे नेतृत्व आहे. त्यांची ऊर्जा ‘ईश्वरी’ असून त्यांच्याकडून नेहमीच ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. मिंधे यांना मिळणाऱ्या प्रेरणेतूनच त्यांनी भ्रष्टाचाराचा भंगार माल लोकसभा निवडणुकीत उतरवला आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे.
मिंधे आणि त्यांच्याबरोबरीने फुटलेले 40 जण हे ‘मोदी पॅटर्न’मधील भटकते आणि वखवखलेले आत्मेच आहेत. त्यामुळे त्यांना मोदी यांच्याकडून प्रेरणा आणि ऊर्जा मिळणे स्वाभाविक आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे. (Lok Sabha Election 2024: Thackeray group hits back at Modi over Sharad Pawar’s criticism)

मोदी – अमित शहा यांनी सध्या महाराष्ट्रातच ठाण मांडले आहे. त्यांचे आत्मे महाराष्ट्रात वखवखल्यासारखे फिरत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगेससारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष फोडूनही मोदी यांचा आत्मा शांत झाला नाही. कारण त्यांना उद्या महाराष्ट्रापासून मुंबईचा लचका तोडायचा आहे, पण ते कदापि शक्य होणार नाही. महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या 107 हुतात्म्यांचे ‘आत्मे’ महाराष्ट्रावरील आकाशात फिरत आहेत आणि ते सर्व मोदी-शहांची भुताटकी कायमची नष्ट करतील, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : त्यांची विकेट आधीच पडली, ते क्लिन बोल्ड; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मोदी-शहा आणि त्यांचे मित्रमंडळ महाराष्ट्राच्या बाबतीत साशंक आहेत. महाराष्ट्रात हे वखवखते आत्मे कितीही भटकत राहिले तरी त्यांना विजय मिळणार नाही. मुलुंडच्या पोपटलालसारखे (किरीट सोमय्या) ‘मुंजे’ तर रवींद्र वायकर, यामिनी जाधव यांच्या उमेदवारीनंतर स्मशानातील पिंपळावर जाऊन उलटे लटकणार आहेत, अशी बोचरी टीका या अग्रलेखात करण्यात आली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात मोदी काळात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अनेक विधवांनी आपली मंगळसूत्रे, जमिनी गहाण टाकल्या. सावकारी कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या केल्या. या सगळ्यांच्या इच्छा अतृप्त आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांचे आत्मे भाजपाच्या मानगुटीवर बसणार आहेत, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.

हेही वाचा – Lok Sabha2024 : दुसऱ्याचं पोर कडेवर खेळवणार नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंवर अनिल परबांची टीका; म्हणाले, आता कोणाचं पोर…


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -