घरक्रीडाIPL 2022: आयपीएलच्या सर्व संघाच्या नवीन जर्सी पाहिल्यात का?

IPL 2022: आयपीएलच्या सर्व संघाच्या नवीन जर्सी पाहिल्यात का?

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीग (IPL 2022) स्पर्धेत दरवर्षी अनेक बदल होत असतात. खेळाडूंच्या आदलाबदलपासून ते नियमावलीमध्ये मोठे बदल होत असतात. यंदाही आयपीएलमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यंदा आयपीएलमधील संघांच्या जर्सीतही बदल करण्यात आले आहेत. या नव्या जर्सी आकर्षित असून, सर्व संघाच्या खेळाडूंनी आपल्या नवीन जर्सीसोबतचा एक जाहिरात व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

राजस्थान रॉयल्स

- Advertisement -

IPL 2022 साठी राजस्थान रॉयल्सने अधिकृतपणे त्यांची नवीन जर्सी लॉन्च केली आहे. राजस्थान रॉयल्सनं आपल्या जर्सीचे एका फिल्मी अंदाजात स्पोर्ट बाईकवर खतरनाक स्टंट करत अनावरण केले आहे. ऑस्ट्रेलियन स्टंट परफॉर्मर रॉबी मॅडिसन यानं स्पोर्ट्स बाईक चालवत हे खतरनाक स्टंट केले आहेत. यासाठी राजस्थान रॉयल्सच्या टीमने एक स्टंट इव्हेंट आयोजित केला होता.

- Advertisement -

गुजरात टायट्न्स

गुजरातची जर्सी गडद निळ्या आणि आकाशी रंगांची आहे. जर्सीला वरपासून खालपर्यंत निळा रंग आहे आणि बाजूंना आकाशी रंगाची पट्टे आहेत. मात्र, या संघाच्या जर्सीवर इतर संघांप्रमाणे सिंह किंवा इतर कोणतेही चिन्ह नाही. बाजूला आकाशी रंगाचे हलके पट्टे आखण्यात आले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

आपली नवीन जर्सीचे आनावरण करण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली. आयपीएल २०२२ मध्ये बंगळुरूचा संघ फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या संघाने तब्बल ९ वर्षांनी आपला कर्णधार बदलला आहे. आरसीबीने त्यांच्या नवीन जर्सीची घोषणा करण्यासोबतच विराट आणि फाफ डू प्लेसिसचा फोटोही शेअर केला आहे. आरसीबीच्या जर्सीत फारसा बदल करण्यात आलेला नाही. ही जर्सी गडद निळ्या आणि लाल रंगांपासून बनवली आहे. खेळाडूंच्या खांद्यावर आणि छातीभोवती काळा रंग असेल, तर तळाशी लाल जर्सी असेल.

मुंबई इंडियन्स

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

मुंबई इंडियन्सच्या संघाने आपली नवीन जर्सी आधीच जाहीर केली आहे. मुंबईच्या जर्सीत फारसा बदल झालेला नाही. नव्या जर्सीवर निळा रंग असून बाजूने सोनेरी रंगाची पट्टीही बनवण्यात आली आहे. जर्सीचा खालचा भाग निळ्या कोलाजसारखा दिसत आहे.

दिल्ली कॅपिटल्स

 

View this post on Instagram

 

A post shared by Delhi Capitals (@delhicapitals)

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2022 साठी नवीन जर्सी देखील जाहीर केली आहे. दिल्लीची नवीन जर्सी २ रंगांची आहे. या नव्या जर्सीमध्ये लाल आणि निळा रंग एकत्र करण्यात आला आहे. जर्सीची उजव्या बाजूला निळ्या रंग असुन डाव्या बाजुला लाल रंग आहे. या जर्सीमध्ये दिल्लीचा वाघ आणि त्याचे पट्टेही छापण्यात आले आहेत.

पंजाब किंग्ज

 

View this post on Instagram

 

A post shared by Punjab Kings (@punjabkingsipl)

पंजाब किंग्जची नवीन जर्सी रिलीज करण्यात आली आहे. अनेक सोशल मीडिया अकाउंटवर पंजाबची नवीन जर्सी दाखवण्यात आली आहे. पंजाबची नवीन जर्सी पूर्णपणे लाल रंगाची असून, खालच्या बाजूला फिकट काळ्या रंगापासून बनवलेले सिंहाचे चिन्ह आहे. तर बाजूला सोनेरी रंगाच्या पट्ट्या करण्यात आल्या आहेत. पंजाबचा संघ यंदा भारताच्या कसोटी संघाचा सलामीवर मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज

 

View this post on Instagram

 

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl)

आयपीएलचे जेतेपद ४ वेळा जिकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने भारतीय लष्कराचा मान राखत नवीन जर्सीची घोषणा केली. संघाचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनी, कर्णधार रवींद्र जडेजा आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड नवीन जर्सीसह दिसत आहेत. संघाच्या लोगोच्या वर ४ स्टार छापले आहेत, जे संघाच्या ४ विजेतेपदांना सूचित करतात. यासोबतच भारतीय लष्कराला आदरांजली वाहण्यासाठी खांद्यावर खास लोगो बनवण्यात आला आहे.

कोलकात नाईट रायडर्स

कोलकात्याच्या नवीन जर्सी व्हायोलेट आणि सोनेरी रंगाची आहे. होळीच्या मुहूर्तावर कोलकाताने आपली नवीन जर्सीचे आनावरण केले. यावेळी कॅप्टन अय्यर आणि टीमचे सीईओ वेंकी मैसूरही उपस्थित होते. जर्सी जाहीर झाल्यानंतर सर्व खेळाडूंनी एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या. कोलकाताने नवीन जर्सीचा एक व्हिडिओ जारी केला होता, ज्यामध्ये कोलकाताचे खेळाडू आता कसे दिसतील.

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) स्पर्धेचा १५ वा हंगाम होणार आहे. येत्या २६ मार्चपासून ही स्पर्धा सुरु होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या ३ शहरात खेळवले जाणार आहेत.

 

 

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -