घरक्रीडाDuleep Trophy : सामना जिंकण्यासाठी जयंत यादवच्या संघाकडून लाजिरवाणे कृत्य; कारवाई होणार?

Duleep Trophy : सामना जिंकण्यासाठी जयंत यादवच्या संघाकडून लाजिरवाणे कृत्य; कारवाई होणार?

Subscribe

जंटलमन्स गेम समजल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये गेल्या काही काळापासून अनेक वाद झाले आहेत. अनेक वेळा खेळाडू आणि संघ मैदानावर असे काही तरी करतात की, त्यांच्यावर आणि त्यांच्या संघाच्या प्रतिमेवर डाग पडतो. अशीच एक घटना भारताच्या देशातंर्गत क्रिकेटमध्ये पडली आहे.

सध्या देशात दिलीप ट्रॉफीचे (Duleep Trophy) सामने सुरू आहेत. नुकत्याच खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात उत्तर विभाग आणि दक्षिण विभाग आमनेसामने होते. यावेळी दक्षिण विभाग संघाने सामना जिंकण्यासाठी बेईमानीच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर संघावर टीकेची झोड उठत असून भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) या सर्व प्रकारावर कठोर कारवाई करणार का?, हे पाहावे लागेल.

- Advertisement -

दिलीप ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामना उत्तर विभाग आणि दक्षिण विभाग यांच्यात बेंगळुरू येथे खेळला गेला. या सामन्याच्या पहिल्या डावात उत्तर विभागाने 198 धावा केल्या, तर दक्षिण विभाग पहिल्या डावात सर्वबाद 195 धावांच करू शकला. यानंतर दुसऱ्या डावात उत्तर विभागाने 211 धावा केल्या. त्यामुळे दक्षिण विभागाला सामना जिंकण्यासाठी 215 धावांचे लक्ष्य होते. पण सामन्याच्या 5 व्या दिवशी पावसाचे आगमन झाले. त्यामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात उत्तर विभागाचा संघ चांगलाच फसला. उत्तर विभागाचा कर्णधार जयंत यादव आणि त्याच्या गोलंदाजांनी सामन्यादरम्यान वेळ वाया घालवण्यास सुरुवात केली. हे करण्यामागचे कारण असे की, यामुळे सामना अनिर्णित संपला असता आणि उत्तर विभागाला विजय घोषित केले असते. कारण त्यांच्याकडे पहिल्या डावाच्या आधारे 3 धावांची आघाडी होती.

5.5 षटके टाकण्यासाठी 53 मिनिटांचा वेळ घेतला

पाचव्या दिवशी पावसामुळे आधीच 100 मिनिटे वाया गेली होती. दोन्ही संघ जेव्हा मैदानावर खेळण्यासाठी आले तेव्हा दक्षिण विभागाला विजयासाठी 32 धावांची गरज होती, तर उत्तर विभागाला विजयासाठी 6 विकेट्सची गरज होती. त्यमुळे दक्षिण विभाग सहज सामना जिंकले असेच वाटते होते. त्यामुळे उत्तर विभागाने सामना जिंकण्यासाठी वेळ वाया घालवण्याचा निर्णय घेतला आणि 5.5 षटके टाकण्यासाठी तब्बल 53 मिनिटे लावली. पण या सर्व गोष्टींचा त्यांना काहीच फायदा होऊ शकला नाही. दक्षिण विभागाने 2 विकेट राखून सामना जिंकला आणि अंतिम फेरीत धडक मारली.

- Advertisement -

12 जुलैपासून अंतिम सामना

दिलीप ट्रॉफीचा पहिला उपांत्य फेरीचा सामना अनिर्णित राहिला, परिणामी पहिल्या डावात आघाडी घेतलेल्या पश्चिम संघाला विजय घोषित करण्यात आले. तसेच दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण विभागाने 2 विकेट राखून सामना जिंकला. त्यामुळे दोन्ही संघ अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना 12 जुलैपासून बेंगळुरू येथे होणार आहे.


हेही वाचा : Ashes 2023 : इंग्लंडला पहिला सामना जिंकण्याची संधी; ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात 224 धावांवर सर्वबाद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -