घरक्रीडाMI vs KKR: कोलकाताचे अस्तित्व संपुष्टात; मुंबई पहिल्या क्रमांकावर

MI vs KKR: कोलकाताचे अस्तित्व संपुष्टात; मुंबई पहिल्या क्रमांकावर

Subscribe

मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या माऱ्यापुढे कोलकाताच्या वरच्या फळीतील फलंदाज टिकू शकले नाहीत. कोलकाता २० षटकांत ७ बाद आणि फक्त १३३ धावांपर्यंत पोहोचू शकला. त्यानंतर कोलकाताने दिलेल्या १३४ धावांच्या माफक आव्हानाला मुंबईने सहज पूर्ण केले.

मुंबईने केलेल्या आक्रमक फलंदाजी पुढे कोलकाता नाईट रायडर्सचे या मोसमातील अस्तित्व संपुष्टात आले आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यात मुंबईने बाजी मारली आहे. मुंबईने आपले ९ गडी राखत कोलकातावर मात केली. यासोबतच मुंबईने गुणतालिकेत प्रथम क्रमांकावरचे स्थान पटकावले आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माची भूमिका महत्त्वाची ठरली. रोहित शर्माने नाबाद खेळी खेळत आपले अर्धशतक पूर्ण केले.

नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या माऱ्यापुढे कोलकाताच्या वरच्या फळीतील फलंदाज टिकू शकले नाहीत. कोलकाता २० षटकांत ७ बाद आणि फक्त १३३ धावांपर्यंत पोहोचू शकला. त्यानंतर कोलकाताने दिलेल्या १३४ धावांच्या माफक आव्हानाला मुंबईने सहज पूर्ण केले. सलामीवीर क्वींटन डी कॉकने २३ चेंडूत ३० धावा केल्या. उंच फटका मारण्याच्या गडबडीत तो बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव यांनी डाव सावरत सामना जिंकला. रोहितने ४८ चेंडूत ५५ धावा केल्या. तर सुर्यकुमारने २७ चेंडूत ४६ धावा केल्या.

- Advertisement -

त्याअगोदर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाताची सुरवात खराब झाली. सलामीवीर शुभमन गीलचा हार्दिक पांड्याने त्रिफळा उडवला. ख्रीस लीन आणि रॉबिन उथप्पा यांनी डाव सावरला. मात्र, धिम्या गतीने धावसंख्या वाढत होती. ख्रीस लीन उंच फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्याने २९ चेंडूत ४१ धावा केल्या. उथप्पा देखील झेलबाद झला. त्यानंतर दिनेश कार्तिक स्वस्तात तंबूत परतला. त्याने ९ चेंडू खेळून फक्त ३ धावा केल्या. आंद्रे रसल तर शुन्यावरच बाद झाला. नितीश राणाने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो देखील झेलबाद झाला. त्याने १३ चेंडूत २६ धावा केल्या. त्यानंतर रिंकू सिंग आणि सुनील नरीनही लवकर बाद झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -