घरक्रीडामीराबाई चानूने कठिण काळात मदत करणाऱ्या ट्रक ड्रायवरचे मानले आभार,ट्रकमध्ये बसून गाठत...

मीराबाई चानूने कठिण काळात मदत करणाऱ्या ट्रक ड्रायवरचे मानले आभार,ट्रकमध्ये बसून गाठत असे ट्रेनिंग सेंटर

Subscribe

रौप्य पदक जिंकल्यानंतर मीराबाईने ट्रक ड्रायवरचा शोध घेतला व त्यांना घरी बोलावून त्यांचे स्वागत केले.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये घवघवीत यश संपादन करणारी 26 वर्षीय वेटलिफ्टर मीराबाई चानूचे कौतूक संपुर्ण देशात होत आहे. भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकच्या ४९ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली.  रौप्य पदक जिंकल्यावर दिल्ली तसेच मणिपूरमध्ये अगदी धूमधडाक्यात मीराबाईचे स्वागत करण्यात आले. मीराबाईचा ऑलिम्पिक मेडल पटकावण्याचा प्रवास म्हणावा तितका सोप्पा नव्हता. खडतर परिश्रम करत राज्य,राष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी बजावत मीराबाई टोकियो ऑलिम्पिकच्या स्पर्धेत दाखल झाली. आज मीराबाई यशाच्या उंच शिखरावर विराजमान आहे. पण तिच्या मदतीसाठी धावून आलेल्या लोकांना मीराबाई विसरली नाहीये. जगभरात आज मीराबाईच्या नवाचा डंका असला तरी कठिण काळात तिच्या पाठीशी उभे असणाऱ्या लोकांचे मीराबाईने आभार मानले आहे. गुरूवारी मीराबाईने ट्रक ड्रायवरला भेटवस्तू देऊन आभार प्रकट केले आहे. कारण याच ट्रक ड्रायवरमुळे मीराबाई ट्रेनिंग सेंटर पर्यंत पोहचत असे. मीराबाईने सांगितले की, त्यांच्या गावामधून इम्फाल स्थित लम्पक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स 25 किलोमीटरच्या दूर अंतरावर होते. यामुळे तिला ट्रकमध्ये बसून ट्रेनिंग सेंटर गाठावे लागत असे. तसेच ट्रक ड्रायवर तिच्याकडून पैसे घेत नसे. यामुळे मीराबाईच्या पैशांची बचत देखील होत असे. रौप्य पदक जिंकल्यानंतर मीराबाईने ट्रक ड्रायवरचा शोध घेतला व त्यांना घरी बोलावून त्यांचे स्वागत केले.
मीराबाईची आई सैखोम ओंगबी टोम्बो देवी गावात चहा विकत असे. त्यांनी सांगितले की, एथम मोइरंगपुरेल येथून येणारे ट्रक त्यांच्या गावातील रस्त्यावरुन जात असे तेव्हा ड्रायवर त्यांच्या चहाच्या दुकानावर थांबून चहा पित असे. याचदरम्यान ते मीराबाईला फ्री मध्ये ट्रेनिंग सेंटर इम्फाला पर्यंत पोहचवत असे.
Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -