घरक्रीडाIND vs ENG : राहुलचे अर्धशतक; चांगल्या सुरुवातीनंतर भारताचा डाव गडगडला

IND vs ENG : राहुलचे अर्धशतक; चांगल्या सुरुवातीनंतर भारताचा डाव गडगडला

Subscribe

भारताची ४६.२ षटकांत ४ बाद १२५ अशी धावसंख्या होती.

लोकेश राहुलचे नाबाद अर्धशतक आणि त्याला सलामीचा साथीदार रोहित शर्माने दिलेली साथ यामुळे इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताने चांगली सुरुवात केली होती. भारताची बिनबाद ९७ अशी धावसंख्या होती. मात्र, त्यानंतर भारताचा डाव गडगडला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रात पावसामुळे खेळ थांबवावा लागला, त्यावेळी भारताची ४६.२ षटकांत ४ बाद १२५ अशी धावसंख्या होती. त्यामुळे पहिल्या डावात भारतीय संघ ५८ धावांनी पिछाडीवर होता. जवळपास दोन वर्षांनंतर कसोटी सामना खेळणाऱ्या राहुलने झुंजार फलंदाजी केली. तो १४९ चेंडूत ५७ धावांवर नाबाद होता.

नॉटिंगहॅम येथे होत असलेल्या या कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमान इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांत गारद झाला. याचे उत्तर देताना भारताची बिनबाद २१ अशी धावसंख्या होती. दुसऱ्या दिवशी या धावसंख्येवरुन पुढे खेळताना भारताचे सलामीवीर राहुल आणि रोहित यांनी संयमाने फलंदाजी सुरु ठेवली. या दोघांनी ९७ धावांची सलामी दिल्यावर रोहितला (३६) ऑली रॉबिन्सनने बाद केले.

- Advertisement -

तर चेतेश्वर पुजारा (४) आणि कर्णधार विराट कोहली (०) यांना सलग दोन चेंडूंवर जेम्स अँडरसनने माघारी पाठवले. अजिंक्य रहाणेलाही फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. अवघ्या पाच धावांवर त्याला जॉनी बेअरस्टोने धावचीत केले. एका बाजूने विकेट जात असताना राहुलने चांगली फलंदाजी सुरु ठेवत सप्टेंबर २०१८ नंतरचे पहिले कसोटी अर्धशतक झळकावले.

भारताची गोलंदाजी सर्वोत्तम – ट्रेस्कोथिक

भारताने पहिल्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव केवळ १८३ धावांत गुंडाळला. भारताने या सामन्यात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर आणि मोहम्मद सिराज या तेज चौकडीला संधी दिली. या चौघांनी मिळूनच इंग्लंडच्या सर्व विकेट घेतल्या. त्यामुळे भारताची गोलंदाजांची फळी सध्याच्या घडीला बहुधा जगात सर्वोत्तम असल्याचे विधान इंग्लंडचे फलंदाजी प्रशिक्षक मार्कस ट्रेस्कोथिक यांनी केले. मागील काही वर्षांतील कामगिरीवर नजर टाकल्यास भारताची वेगवान गोलंदाजांची फळी सध्या जगात बहुधा सर्वोत्तम आहे असे म्हणता येईल. त्यांच्याकडे सर्व प्रकारचे गोलंदाज असून त्यांच्यात विविधता आहे, असे ट्रेस्कोथिक म्हणाले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -