घरक्रीडाजगात बेन स्टोक्ससारखा दुसरा खेळाडू नाही - गंभीर 

जगात बेन स्टोक्ससारखा दुसरा खेळाडू नाही – गंभीर 

Subscribe

स्टोक्स 'मॅचविनर' आहे, असे भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला वाटते.

जागतिक क्रिकेटमध्ये बेन स्टोक्ससारखा दुसरा खेळाडू नाही, असे भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला वाटते. इंग्लंडने मागील वर्षी घरच्या मैदानावर झालेला एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. इंग्लंडच्या या विश्वविजयात स्टोक्सने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सध्या सुरु असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतही स्टोक्स उत्कृष्ट कामगिरी करत आहे. त्याने दुसऱ्या कसोटीत १७६ आणि नाबाद ७८ धावांची खेळी करतानाच तीन गडीही बाद केले होते. या कामगिरीच्या आधारे त्याने कसोटी क्रमवारीतील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी झेप घेतली. त्यामुळेच गंभीरने स्टोक्सचे कौतुक केले.

स्टोक्सचा दर्जाच वेगळा

भारताच्या कोणत्याही खेळाडूची बेन स्टोक्सशी तुलना होऊ शकत नाही. स्टोक्सचा दर्जाच वेगळा आहे. त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला फक्त भारतातच नाही, तर जगात स्टोक्ससारखा दुसरा खेळाडू नाही. कोणत्याही क्षणी सामना आपल्या संघाच्या बाजूने फिरवण्याची त्याच्यात क्षमता आहे. तो ‘मॅचविनर’ आहे. प्रत्येक कर्णधाराचे स्टोक्ससारखा खेळाडू आपल्या संघात असावा असे स्वप्न असते. तो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांत अप्रतिम कामगिरी करतो, असे गंभीरने नमूद केले.

- Advertisement -

स्वतः चांगली कामगिरी करून इतर खेळाडूंपुढे आदर्श

विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीत स्टोक्सने इंग्लंड संघाचे पहिल्यांदा नेतृत्व केले, पण इंग्लंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार स्टोक्सबाबत गंभीर म्हणाला की, स्टोक्समध्ये नेतृत्व गुण आहेत. तुम्हाला इतरांना सल्ले देण्यासाठी कर्णधार असण्याची गरज नसते. तुम्ही स्वतः चांगली कामगिरी करून इतर खेळाडूंपुढे आदर्श ठेवू शकता. स्टोक्स हेच करतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -