घरताज्या घडामोडीCoronavirus : अनलॉकनंतर नवी मुंबईतील १४६ पोलिसांना कोरोना

Coronavirus : अनलॉकनंतर नवी मुंबईतील १४६ पोलिसांना कोरोना

Subscribe

अनलॉकनंतर नवी मुंबई पोलीस दलात काम करणाऱ्या १४६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे अनलॉक प्रक्रिया सरु करण्यात आली आहे. या अनलॉकनंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. अनलॉकनंतर पोलीस विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या वाहनांवरील कारवाई दरम्यान, नवी मुंबई पोलीस दलातील अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. नवी मुंबईत २६ जुलै रोजी २४ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून यामध्ये कामोठे पोलीस ठाण्यातील आठ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या पोलिसांना कोरोनाची बाधा अधिक प्रमाणात होताना दिसत आहे. नवी मुंबई पोलीस दलात काम करणाऱ्या १४६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. यापैकी काही पोलिसांच्या कुटुंबियांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ५० टक्के पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांनी कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत.

- Advertisement -

पोलिसांचे कुटुंबीयही कोरोनाच्या विळख्यात

नवी मुंबईत पोलीस कर्मचारी २४ तासांपैकी १४ तास रस्त्यावर उभे राहून कर्तव्य पार पाडत आहेत. हे कर्तव्य पार पाडत असताना नवी मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या माथी आता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार चौकाचौकात उभं राहून हे कर्मचारी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कारवाई करताना दिसून येत आहे. या कारवाई दरम्यान पोलीस कर्मचारी अनेकांच्या संपर्कात येत असून त्यांना देखील कोरोनाची लागण होऊ लागली आहे.


हेही वाचा – गेट परीक्षा फेब्रुवारी २०२१ मध्ये

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -