घरक्रीडाIND vs ENG : जे इतर कोणत्याही भारतीयाला जमले नाही, ते प्रसिध...

IND vs ENG : जे इतर कोणत्याही भारतीयाला जमले नाही, ते प्रसिध कृष्णाने केले!

Subscribe

इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत प्रसिधने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मंगळवारी (काल) झाला. कसोटी आणि टी-२० मालिकेत भारताने पहिले सामने गमावले होते. एकदिवसीय मालिकेची मात्र विजयी सुरुवात करण्यात भारताला यश आले. भारताने पहिला एकदिवसीय सामना ६६ धावांनी जिंकत तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने महत्वाची भूमिका बजावली. प्रसिधला या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. या संधीचे सोने करताना त्याने ५४ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट घेतल्या. या कामगिरीसह त्याने अनोखा विक्रम रचला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणात ४ विकेट घेणारा तो भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला.

भारताला विजय मिळवून दिला  

प्रसिधला इंग्लंडच्या डावाच्या सुरुवातीला चांगली गोलंदाजी करता आली नाही. इंग्लंडचे सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी त्याच्या गोलंदाजीवर फटकेबाजी केली. त्याने पहिल्या ३ षटकांत ३७ धावा खर्ची केल्या होत्या. मात्र, त्याने दमदार पुनरागमन करत रॉय आणि बेन स्टोक्स यांना बाद करत इंग्लंडला अडचणीत टाकले. त्यानंतर त्याने सॅम बिलिंग्स आणि टॉम करन यांना माघारी पाठवत भारताला विजय मिळवून दिला.

- Advertisement -
best odi bowling on debut
एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणात सर्वोत्तम गोलंदाजी

नोएल डेविडचा विक्रम मोडला 

प्रसिधने ८.१ षटकांत ५४ धावांत ४ विकेट घेतल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणात भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. याआधी हा विक्रम नोएल डेविडच्या नावे होता. डेविडने १९९७ मध्ये विंडीजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना २१ धावांत ३ विकेट घेतल्या होत्या. तसेच प्रसिध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणात ४ विकेट घेणारा भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -