घरक्रीडा...म्हणून कॉमेंट्री पॅनेलमधून हटवलं - संजय मांजरेकर

…म्हणून कॉमेंट्री पॅनेलमधून हटवलं – संजय मांजरेकर

Subscribe

कॉमेंट्री पॅनेलमधून हटवल्यानंतर मांजरेकरांनी सोडलं मौन

बीसीसीआयने संजय मांजरेकर यांना आपल्या समालोचकांच्या यादीतून वगळल्यानंतर संजय मांजरेकर यांनी यावर मौन सोडले आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेत समालोचन पॅनेलमधून संजय मांजरेकर यांना वगळण्यात आले होते. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर उर्वरित दोन सामने करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आले.

- Advertisement -

समालोचन पॅनेलमधून काढून टाकल्यानंतर संजय मांजरेकर म्हणाले की, मी समालोचनाला नेहमीच मोठा विशेषाधिकार समजला आहे, परंतु मी कधीही त्यावर हक्क गाजवला नाही. मला समालोचन पॅनेलमध्ये निवडायचे की नाही हा बोर्डाचा अधिकार आहे आणि मी नेहमीच त्याचा आदर करीन. कदाचित या आधिच्या माझ्या कामावर बीसीसीआय खुश नसेल. व्यावसायिकदृष्ट्या मी ते स्वीकारतो.


हेही वाचा – राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ३३ वरुन ३७ वर

संजय मांजरेकर यांना समालोचन पॅनेलमधून का हटवण्यात आले? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. धर्मशाळा एकदिवसीय सामन्याकरता सुनिल गावसकर, लक्ष्मण, शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक हे माजी खेळाडू समालोचनासाठी हजर होते. मात्र यामध्ये संजय मांजरेकर नव्हते. आगामी आयपीएल स्पर्धेतही मांजरेकर यांना वगळले जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -