घरक्रीडाT20 World Cup : मोहम्मद शमी बाहेर तर ऋषभ पंत खेळण्याची शक्यता;...

T20 World Cup : मोहम्मद शमी बाहेर तर ऋषभ पंत खेळण्याची शक्यता; जय शहा काय म्हणाले…

Subscribe

नवी दिल्ली : स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आयपीएल 2024 आणि त्यानंतर टी-20 विश्वचषक 2024 मधून बाहेर पडल्याने भारतीय क्रिकेट संघासह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र दुसरीकडे दिलासा देणारी बातमीही समोर येत आहे. भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आता पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएल 2024 मध्ये खेळण्यासाठी बेंगळुरूस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) कडून हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर पंतने यष्टिरक्षणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आयपीएल 2024 मध्ये पुनरागमन केल्यानंतर ऋषभ पंत टी-20 विश्वचषक देखील खेळू शकतो, असे मोठे वक्तव्य बीसीसीआय अध्यक्ष जय शहा यांनी केले आहे. (T20 World Cup Mohammed Shami out Rishabh Pant likely to play What Jai Shah)

हेही वाचा – CAA : सुधारित नागरिकत्व कायद्याची अधिसूचना जारी, लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय

- Advertisement -

जय शहा म्हणाले की, घोट्याच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या मोहम्मद शमीवर लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे तो आयपीएल आणि विश्वचषक खेळणार नाही. मात्र बांग्लादेशविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी शमी पुनरागमन करून शकतो, असे जय शहा यांनी स्पष्ट करतानाच ऋषभ पंतबाबत मोठे वक्तव्य केले. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या भीषण कार अपघातानंतर ऋषभ पंत सध्या सावरत असून क्रिकेटच्या मैदानावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे तो आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

याचपार्श्वभूमीवर बोलताना जय शहा म्हणाले की, ऋषभ पंत चांगली फलंदाजी आणि यष्टीरक्षण करत आहे. त्यामुळे आम्ही त्याला लवकरच फिट घोषित करू. जर तो टी-20 विश्वचषक खेळू शकला तर ती आमच्यासाठी मोठी गोष्ट असेल. तो आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. जर तो उत्तम यष्टीरक्षण करू शकला तर तो विश्वचषक खेळू शकतो. त्यामुळे तो आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, असे सूचक वक्तव्य जय शहा यांनी केले.

- Advertisement -

हेही वाचा – MAHARERA : महारेराने 13 हजार 785 स्थावर संपदा एजन्ट्सची नावे मान्यताप्राप्त यादीतून वगळली

दरम्यान, घोटाची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मला बरं होण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण मी माझ्या पायावर उभा राहण्यासाठी उत्सुक आहे, असं मोहम्मद शमी म्हणाला होता. त्यामुळे शमी विश्वचषक नक्की खेळेल, अशी आशा सर्वांना होती. मात्र, आता तो विश्वचषकातून बाहेर झाला असल्याचे भारतीय संघाला मोठा धक्का बसला असून चाहतेही निराश झाले आहेत. तर दुसरीकडे गेल्या 15 दिवसांपासून दुखापतीमुळे बाहेर असलेल्या ऋषभ पंत आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. पंत सध्या आगामी स्पर्धेच्या प्रमोशनल शूटमध्ये व्यस्त असून काही दिवस दिल्लीत असेल. यानंतर, तो दिल्ली कॅपिटल्ससह आयपीएल 2024 हंगामाच्या सुरुवातीच्या तयारीसाठी शिबिरात सामील होण्यासाठी विशाखापट्टणमला जाणार आहे. त्यामुळे जर आयपीएलमध्ये ऋषभ पंतने चांगले प्रदर्शन केले तर भारतीय संघाची दारे त्याच्यासाठी खुली होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -