घरमुंबईMAHARERA : महारेराने 13 हजार 785 स्थावर संपदा एजन्ट्सची नावे मान्यताप्राप्त यादीतून...

MAHARERA : महारेराने 13 हजार 785 स्थावर संपदा एजन्ट्सची नावे मान्यताप्राप्त यादीतून वगळली

Subscribe

मुंबई : स्थावर संपदा एजंटसनी 2017 साली मिळालेल्या परवान्याचे नुतनीकरण केले नाही म्हणून महारेराने 13 हजार 785 एजंटसची नोंदणी रद्द केली असल्याची माहिती महारेराच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या सर्व एजन्ट्सची संकलित यादी महारेराने संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या एजन्ट्सना पुन्हा एजन्ट्स म्हणून काम करायचे असल्यास विहित प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण होणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय महारेराकडून घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये मुंबई आणि मुंबई उपनगराचे 6 हजार 291 असे सर्वात जास्त एजन्ट्स असून त्यानंतर ठाणे 3 हजार 75 आणि पुण्यातील 2 हजार 349 एजन्ट्सचा क्रमांक लागतो. (Maharera removed names of 13 thousand 785 real estate agents from the approved list)

हेही वाचा… सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक शिंदेंचा मुलगा आणि नातू लिफ्टमध्ये अडकले; 45 मिनिटांनी सुटका

- Advertisement -

एकीकडे नुतनीकरणा अभावी अशी संख्या कमी होत असताना नवीन एजन्ट्सही पात्र ठरले आहेत. एजन्ट्ससाठी विहित केलेली चौथी परीक्षा नुकतीच घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात 1 हजार 767 उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1 हजार 527 उमेदवार पात्र ठरले आहेत. तर 240 उमेदवार नापास झाले आहेत. या परीक्षेचा निकाल 86.41% टक्के लागला असून मुंबईतील आरोही चिराग भिमाजियानी ह्या 100% गुण मिळवून प्रथम आल्या असल्यचाी माहिती देण्यात आली आहेत. आतापर्यंत झालेल्या 4 परीक्षांमध्ये 100 टक्के गुण मिळविणाऱ्या त्या पहिल्या उमेदवार ठरल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.

नोंदणी रद्द केलेल्या एजंटसची जिल्हानिहाय संख्या

- Advertisement -

मुंबई उपनगर 4353
ठाणे 3075
पुणे 2349
मुंबई शहर 1938
रायगड 770
पालघर 433
नागपूर 374
नाशिक 195
अमरावती 43
छ.संभाजीनगर 38
कोल्हापूर 30
अहमदनगर 21
रत्नागिरी 20
जळगाव ,सातारा प्रत्येकी 19
चंद्रपूर, सोलापूर प्रत्येकी 15
धुळे 12
सांगली 11
भंडारा 9
अकोला, सिंधुदुर्ग, वर्धा प्रत्येकी 7
जालना 6
गोंदिया 4
लातूर 3
बुलडाणा, दादरा नगर हवेली, नांदेड, यवतमाळ प्रत्येकी 2
हिंगोली,उस्मानाबाद, परभणी, वाशीम प्रत्येकी 1 अशा एकूण 13 हजार 785 एजन्ट्सच्या नोंदणी महारेराकडून रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -