घरक्रीडाIPL Auction : आयपीएल लिलावात कोट्यवधीची बोली, ६२ खेळाडूंची चांदी!

IPL Auction : आयपीएल लिलावात कोट्यवधीची बोली, ६२ खेळाडूंची चांदी!

Subscribe

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या पुढील मोसमाआधी गुरुवारी कोलकाता येथे खेळाडू लिलाव पार पडला. या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल १५.५ कोटी रुपये इतकी रक्कम मोजत कमिन्सला आपल्या संघात समाविष्ट केले. त्याचे ऑस्ट्रेलियन संघातील सहकारी ग्लेन मॅक्सवेल आणि नेथन कुल्टर-नाईल यांच्यावरही संघांनी मोठी बोली लावली. मॅक्सवेलला १०.७५ कोटी रुपयांत किंग्स इलेव्हन पंजाबने, तर कुल्टर-नाईलला ८ कोटी रुपयांत गतविजेत्या मुंबई इंडियन्सने खरेदी केले. या लिलावात आठ संघांनी मिळून एकूण ६२ खेळाडूंवर खरेदी केले, ज्यात २९ परदेशी खेळाडूंचा समावेश होता. भारतीय खेळाडूंमध्ये पियुष चावला यंदाच्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्स संघाने ६.७५ कोटी इतकी रक्कम मोजली.

मुंबई इंडियन्स : क्रिस लिन (२ कोटी), नेथन कुल्टर-नाईल (८ कोटी), सौरभ तिवारी (५० लाख), मोहसीन खान (२० लाख), दिग्विजय देशमुख (२० लाख), प्रिन्स बलवंत राय सिंग (२० लाख)

- Advertisement -

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : अॅरॉन फिंच (४.४ कोटी), क्रिस मॉरिस (१० कोटी), जॉश्वा फिलिपे (२० लाख), केन रिचर्डसन (४ कोटी), पवन देशपांडे (२० लाख), डेल स्टेन (२ कोटी), शाहबाझ अहमद (२० लाख), इसुरु उदाना (५० लाख)

दिल्ली कॅपिटल्स : जेसन रॉय (१.५ कोटी), क्रिस वोक्स (१.५ कोटी), अॅलेक्स कॅरी (२.४ कोटी), शिमरॉन हेटमायर (७.७५ कोटी), मोहित शर्मा (५० लाख), तुषार देशपांडे (२० लाख), मार्कस स्टोइनिस (४.८ कोटी), ललित यादव (२० लाख)

- Advertisement -

राजस्थान रॉयल्स : रॉबिन उथप्पा (३ कोटी), जयदेव उनाडकट (३ कोटी), यशस्वी जैस्वाल (२.४ कोटी), अनुज रावत (८० लाख), आकाश सिंह (२० लाख), कार्तिक त्यागी (१.३ कोटी), डेविड मिलर (७५ लाख), ओशेन थॉमस (५० लाख), अनिरुद्ध जोशी (२० लाख), अँड्र्यू टाय (१ कोटी), टॉम करन (१ कोटी)

चेन्नई सुपर किंग्स : सॅम करन (५.५ कोटी), पियुष चावला (६.७५ कोटी), जॉश हेझलवूड (२ कोटी), साई किशोर (२० लाख)

किंग्स इलेव्हन पंजाब : ग्लेन मॅक्सवेल (१०.७५ कोटी), शेल्डन कॉट्रेल (८.५ कोटी), दीपक हुडा (५० लाख), ईशान पोरेल (२० लाख), रवी बिष्णोई (२ कोटी), जिमी निशम (५० लाख), क्रिस जॉर्डन (३ कोटी), तेजिंदर धिल्लोन (२० लाख), प्रभसिमरन सिंग (५५ लाख)

कोलकाता नाईट रायडर्स : इयॉन मॉर्गन (५.२५ कोटी), पॅट कमिन्स (१५.५ कोटी), राहुल त्रिपाठी (६० लाख), वरुण चक्रवर्ती (४ कोटी), एम. सिद्धार्थ (२० लाख), क्रिस ग्रीन (२० लाख), टॉम बँटन (१ कोटी), प्रवीण तांबे (२० लाख), निखिल नाईक (२० लाख)

सनरायजर्स हैदराबाद : विराट सिंह (१.९ कोटी), प्रियम गर्ग (१.९ कोटी), मिचेल मार्श (२ कोटी), संदीप बावनका (२० लाख), फॅबियन अॅलन (५० लाख), अब्दुल समद (२० लाख), संजय यादव (२० लाख)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -