घरक्रीडाT20 World Cup 2024 : वेस्टइंडीजमध्ये विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ल्याचा धोका, पाकिस्तानकडून धमकी

T20 World Cup 2024 : वेस्टइंडीजमध्ये विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ल्याचा धोका, पाकिस्तानकडून धमकी

Subscribe

युनायटेड स्टेट्स आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धा सुरु होण्यास जवळपास एक महिना बाकी असतानाच वेस्ट इंडिजला दहशतवादी हल्ल्यासंदर्भात धमकी मिळाली आहे.

नवी दिल्ली : युनायटेड स्टेट्स आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धा सुरु होण्यास जवळपास एक महिना बाकी असतानाच वेस्ट इंडिजला दहशतवादी हल्ल्यासंदर्भात धमकी मिळाली आहे. ही धमकी पाकिस्तानातून मिळाली असून क्रिकेट वेस्ट इंडिजने याप्रकरणी सुरक्षा व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. तसेच आयसीसीला निवेदनाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. (terrorist attack threat t20 world cup west indies pakistan)

दहशतवादी हल्ल्यासंदर्भात माहिती देतना त्रिनिदादचे पंतप्रधान कीथ रॉली म्हणाले की, आम्ही या धोक्याचा सामना करण्यासाठी सुरक्षा उपायांबाबत अतिरिक्त प्रयत्न करणार आहोत. कारण पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतासह 20 संघ सहभागी होणार आहेत. काही प्राथमिक फेरीच्या सामन्यांव्यतिरिक्त, संपूर्ण सुपर 8 सामने, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना वेस्ट इंडिजमध्ये खेळवला जाणार आहे. परंतु 21व्या शतकातही दहशतवादाचा धोका वेगवेगळ्या स्वरूपात जगाला कायम आहे आणि हे दुर्दैवी आहे, असे कीथ रॉली यांनी म्हटले.

- Advertisement -

काय म्हणाले वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड?

क्रिकेट वेस्ट इंडीज (CWI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉनी ग्रेव्हज यांनी म्हटले की, आम्ही सर्व भागिधारकांना आश्वस्त करू इच्छितो की, आयसीसी पुरुषांच्या टी-20 विश्वचषकात प्रत्येकाला सुरक्षा देणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. आमच्याकडे सर्वसमावेशक आणि मजबूत सुरक्षा योजना आहे. तर आयसीसीने म्हटले की, संभाव्य धोका लक्षात घेता आम्ही यजमान देश आणि शहरांमधील अधिकाऱ्यांसोबत जवळून काम करतो आहोत. विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही धोक्यांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि ते कमी करण्यासाठी आमच्याकडे योग्य उपाययोजना आहे.

हेही वाचा – IPL 2024 KKR Vs LSG: लखनऊवर केकेआरची मोठी मात;98 धावांच्या फरकाने हरवलं

- Advertisement -

‘नशीर-ए-पाकिस्तान’कडून मिळाली धमकी (Nashir-e-Pakistan Threat received )

प्रो-इस्लामिक स्टेट (दएश) कडून वर्ल्ड कपला संभाव्य धोक्याची गुप्तचर माहिती ‘नशीर-ए पाकिस्तान’ या मीडिया ग्रुपकडून मिळाली आहे. नशिर-ए पाकिस्तान हे इस्लामिक स्टेट गटाशी संबंधित एक प्रचार चॅनल आहे. प्रो-इस्लामिक स्टेट (IS) मीडिया स्रोतांनी क्रीडा स्पर्धांविरुद्ध हिंसा भडकवणाऱ्या मोहिमा सुरू केल्या आहेत, असे चेतावणीमध्ये म्हटले आहे. त्यात IS खोरासान (IS-K) च्या अफगाणिस्तान-पाकिस्तान शाखेच्या व्हिडिओ संदेशांचाही समावेश आहे. हे अनेक देशांमधील हल्ल्यांवर प्रकाश टाकते आणि समर्थकांना ते कोणत्याही देशात असले तरी लढाईत सामील होण्याचे आवाहन करते.

अमेरिकेतील सामन्यांना धोका नाही (America Matches No Threat)

दरम्यान, वेस्ट इंडिजमधील विश्वचषकाचे सामने अँटिग्वा आणि बार्बुडा, बार्बाडोस, गयाना, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे होणार आहेत. तर अमेरिकेतील फ्लोरिडा, न्यूयॉर्क आणि टेक्सास या शहरांमध्येही सामने होणार आहेत, मात्र अमेरिकेतील सामन्यांना कोणताही धोका निर्माण होण्याची चिन्ह नाहीत. दोन्ही उपांत्य फेरीचे सामने त्रिनिदाद आणि गयाना येथे होणार आहेत, तर अंतिम सामना बार्बाडोसमध्ये होणार आहे.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -