घरक्रीडाइंग्लंडमध्ये शतक झळकावण्याचे लक्ष्य -वॉर्नर

इंग्लंडमध्ये शतक झळकावण्याचे लक्ष्य -वॉर्नर

Subscribe

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस मालिकेला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. ५ सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे होईल. या सामन्यातून डेविड वॉर्नर आणि माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ हे दोन मुख्य फलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहेत. मागील वर्षी मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यांत बॉल टॅम्परिंग प्रकरणातील सहभागामुळे या दोघांवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती.

मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आल्याने बंदीचा कालावधी संपल्यानंतर त्यांचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन झाले. ऑस्ट्रेलियाचा संघ ही अ‍ॅशेस मालिका जिंकण्यासाठी या दोघांवर अवलंबून असणार आहे. ३२ वर्षीय सलामीवीर वॉर्नरने कसोटी कारकिर्दीत २१ शतके लगावली आहेत, पण त्याला इंग्लंडमध्ये एकही शतक करता आलेले नाही. त्यामुळे या मालिकेत इंग्लंडमधील पहिले शतक झळकावण्याचे वॉर्नरचे लक्ष्य आहे.

- Advertisement -

मी इंग्लंडमध्ये एकही शतक केलेले नाही. मी इंग्लंडमध्ये काही उत्तम खेळी केल्या आहेत. गोलंदाजांना चांगली झुंज दिली आहे. एक-दोन खराब फटके सोडले, तर मी चांगल्या चेंडूंवरच बाद झालो आहे. २०१५ मध्ये लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात (३८ आणि ८३ धावा) मी शतक करू शकलो नाही याचे खूप दुःख आहे. स्मिथने या सामन्यात २०० धावा धावा केल्या. या सर्व गोष्टींबाबत मी सतत विचार करत आहे. त्यामुळे आता मला मोठी खेळी करायची आहे. या मालिकेत इंग्लंडमधील पहिले शतक करण्याचे माझे लक्ष्य आहे, असे वॉर्नर म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -