घरक्रीडासंघाचे एकच लक्ष्य वर्ल्डकप जिंकण्याचे; कर्णधार रोहित शर्माने बोलून दाखवला निश्चय

संघाचे एकच लक्ष्य वर्ल्डकप जिंकण्याचे; कर्णधार रोहित शर्माने बोलून दाखवला निश्चय

Subscribe

एका खासगी यूट्युब चॅनलला मुलाखत देताना रोहित शर्मा म्हणाला की, आमचे ध्येय निश्चित आहे. आम्हाला वर्ल्डकप जिंकायचा आहे. मला आता चेहरा नव्हे तर त्या खेळाडूची कामगिरीच दिसते.

नवी दिल्ली : अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या विश्वचषकाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. 2011 नंतर यंदा आपल्या देशात विश्वचषक होऊ घातला आहे. यादरम्याच आता या विश्वचषकावर प्रत्येक संघ दावा करू लागला आहे. परंतू याच दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने एका मोठा खुलासा केला आहे. सध्या त्याच्या त्या वक्तव्याची चर्चा होऊ लागली आहे. (The teams only goal is to win the World Cup Captain Rohit Sharma spoke and showed determination)

एका खासगी यूट्युब चॅनलला मुलाखत देताना रोहित शर्मा म्हणाला की, आमचे ध्येय निश्चित आहे. आम्हाला वर्ल्डकप जिंकायचा आहे. मला आता चेहरा नव्हे तर त्या खेळाडूची कामगिरीच दिसते. सोबतच माझी वैयक्तीक कामगिरी काय आणि कशी राहील याबाबत मला सांगता येणार नाही. पण संघाचे एकच लक्ष्य आहे ते म्हणजे वर्ल्डकप जिंकण्याचे. रोहित पुढे म्हणाला की, 2023 च्या वर्ल्डकपमध्ये मी एक शतक करो अथवा दोन शतक किंवा एकही शतक झाले नाही तरी चालेल. पण संघाचे एकच लक्ष्य आहे की, वर्ल्डकप जिंकायचा. ते आमचे मुख्य लक्ष्य आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचेही तो यावेळी म्हणाला.

- Advertisement -

हेही वाचा : म्हाडामध्ये तृतीयपंथीयांसाठी घरे राखीव ठेवण्यासाठी प्रयत्न करणार; रामदास आठवलेंचे आश्वासन

2011 ची पुनरावृत्ती करण्याची तयारी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2011 साली वर्ल्डकप जिंकला होता. तेव्हाही तो वर्ल्डकप भारतात होता. त्यानंतर भारतीय संघाला एकदाही वनडे वर्ल्डकप जिंकता आला नाही. दरम्यान 2015 आणि 2019 मध्ये भारताचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला होता. 2011 पासून भारतीय संघ वर्ल्डकप विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी भारतात वर्ल्डकप होत आहे आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सज्ज झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Pankja Munde :’माझा संघर्ष गोपीनाथ मुंडेंपेक्षाही मोठा; मला एकाचवेळी अनेक पातळ्यांवर लढावे लागते’

तुमचा स्वतःवर विश्वास असणे गरजेचे

याच मुलाखती दरम्यान 2011 च्या विश्वचषक संघात समावेश न करण्याबाबत रोहित म्हणाला, मी जास्त पुढचा विचार करत नाही, संघात तुम्ही कधीही पुनरागमन करू शकता, कोणत्याही वयोगटात, कोणत्याही वेळी तुम्ही पुनरागमन करू शकता. इतर कोणाला नाही हे स्वतःला सिद्ध करण्यासाठी. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत जेव्हा मला संघातून वगळण्यात आले तेव्हा मला वाटले नव्हते की मी कोणताही विश्वचषक खेळू शकेन आणि आता हा माझा तिसरा विश्वचषक आहे. जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अशक्य वाटतात, पण शक्य आहेत. अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी तुमचा स्वतःवर आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास असायला हवा असेही रोहित शर्मा यावेळी म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -