घरनवी मुंबईपदवीधरांना घर बसल्या मतदार नाव नोंदणी (Online voter registration for graduates)...

पदवीधरांना घर बसल्या मतदार नाव नोंदणी (Online voter registration for graduates) करता येणार

Subscribe

मुंबई पदवीधर-शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदार संघासाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम पदवीधर मतदार संघात नव्या मतदारांची नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सेवा करण्याच्या अनुषंगाने निवडणुक आयोगाकडून प्रयत्न सुरु आहेत. येत्या काही दिवसात ऑनलाईन प्रणाली सेवा सुरु झाल्यास पदवीधरांना घर बसल्या नाव नोंदणी करणे शक्य होणार आहे.

नवी मुंबई-
मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदार (Mumbai Graduates, Mumbai Teachers and Konkan Graduate Voters) संघासाठी भारत निवडणूक आयोगाने ३० सप्टेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत नव्याने मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला. कोकण पदवीधर मतदार संघात सन-२०१८ मध्ये १०४२६४ मतदारांची संख्या नोंदली आहे. कोकण विभागात जिल्हा निहाय आकडेवारी पाहता पदवीधरांचा नोंदणी सहभाग कमी असल्याचे समोर आहे. मागील पाच वर्षात मतदारांची वाढलेली संख्या पाहता कोकण पदवीधर मतदार संघ आणि मुंबई विभागातील पदवीधर मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी विशेष उपक्रम आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे मुंबई शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार यादी तयार करुन शिक्षक मतदारांचा यात अधिकाधिक सहभाग असावा यासाठी मोहिम हाती घेण्यात आल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर (Konkan Divisional Commissioner Dr. Mahendra Kalyankar) यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाच्या जाहीर करण्यात आलेल्या कार्यमक्रमानुसार ३० सप्टेंबरला मतदार नोंदणीसाठी जाहिर सूचना प्रसिध्द करणे,१६ ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणी अधिनियम १९६० नुसार वर्तमानपत्रात दिलेल्या नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी करणे, २५ ऑक्टोबरला वर्तमानपत्रातील नोटीसीची दुबार पुर्नप्रसिध्दी करणे, ६ नोव्हेंबर रोजी दावे व हरकती स्विकारणे, २० नोव्हेंबर रोजी हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई करणे, २३ नोव्हेंबरला प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करणे, २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती स्विकारणे, २५ डिसेंबर रोजी दावे व हरकती निकाली काढणे तसेच पुरवणी यादी तयार करुन छपाई करणे आणि ३० डिसेंबरला मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त डॉ.कल्याणकर यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

ऑनलाईन अर्ज भरता येणार
पदवीधर मतदार संघात नव्या मतदारांची नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सेवा करण्याच्या अनुषंगाने निवडणुक आयोगाकडून प्रयत्न सुरु आहेत. येत्या काही दिवसात ऑनलाईन प्रणाली सेवा सुरु झाल्यास पदवीधरांना घर बसल्या नाव नोंदणी करणे शक्य होणार आहे.

नवीन नोंदणी आणि जनजागृतीवर भर
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या क्षेत्रात असणारी विद्यापीठे, महाविद्याले व अभियांत्रिकी महाविद्यालयात कॅम्प घेणे, नव्या मतदारांकरीता जनजागृती करणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.त्याच प्रमाणे सर्व जिल्हाधिकार्‍यांना पदनिर्देशित अधिकार्‍यांकडे पदवीप्राप्त उमेदवारांकरीता अर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहेत, अशी माहिती कोकण आयुक्त डॉ.कल्याणकर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -