घरCORONA UPDATEऑस्ट्रेलियामध्ये भारतीय क्रिकेटर्सचा सन्मान; गल्ल्यांची ओळख होणार खेळाडूंच्या नावाने

ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय क्रिकेटर्सचा सन्मान; गल्ल्यांची ओळख होणार खेळाडूंच्या नावाने

Subscribe

ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या रॉकबॅक उपनगरात नवीन रहिवासी कॉलनीची निर्मिती करण्यात येणार आहे. ज्याच्या गल्ल्यांना भारतीय क्रिकेटर्सची नावे देण्यात येणार आहे. भारतात अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले आहेत. तर काही खेळाडू अजूनही आपली कारकिर्द गाजवत आहेत. यातील सचिन तेंडुलकर, कपिल देव, विराट कोहली या खेळाडूंना ऑस्ट्रेलियाच्या शहरात रस्त्यावर नावे मिळवून देण्याचा सन्मान मिळणार आहे. मेलबर्नमधील या रहिवासी परिसराची निर्मिती एकोलेड एस्टेट करणार असून तेथील गल्ल्यांना तेंडुलकर ड्राईव्ह, कोहली क्रीसेंट आणि देव टेरेस ही नावे ग्राहकांना आकर्षित करत आहेत.

पाकिस्तानचे माजी कर्णधार सांगितले की, विराट कोहली रहिवासी परिसरातील रस्त्यांची नावे इतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्सच्या नावांवरही ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये वॉ स्ट्रीट, मियादाद स्ट्रीट, एंब्रोस स्ट्रीट, सोबर्स ड्राईव्ह, कॅलिस वे, हेडली स्ट्रीट आणि अकरम वे यांचा समावेश आहे. मेलटन काऊंसिलच्या अंतर्गत येणारे रॉकबॅक उपनगर हे भारतीयांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. या परिसरात घर खरेदीला भारतीय मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवतात. या परिसराकरता ६० नावे काउंसिलला पाठवण्यात आली होती. त्यात मास्टर ब्लास्टर सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावाचाही समावेश होता. मात्र या नावाला मान्यता मिळाली नाही. कारण मेलबर्नमध्ये त्याच्या नावाने आधीच मार्गाचे नाव प्रचलित आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

धक्कादायक! व्यावसायिकाने दिली स्वत:च्याच हत्येची सुपारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -