घरक्रीडाIND vs ENG 2nd ODI : शतक करण्यात अपयश, पण कोहलीचा पुन्हा...

IND vs ENG 2nd ODI : शतक करण्यात अपयश, पण कोहलीचा पुन्हा अनोखा विक्रम 

Subscribe

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने ६६ धावांची खेळी केली.

भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला आणि एखादा विक्रम झाला नाही, असे फार कमी वेळा होते. कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने १० हजार धावांचा टप्पा पार केला. ही कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगनंतर केवळ दुसरा फलंदाज ठरला. मात्र, त्याला पुन्हा एकदा अर्धशतकाचे शतकामध्ये रूपांतर करण्यात अपयश आले.

- Advertisement -

१९० व्या डावात विक्रमाला गवसणी

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने ५६ धावांची खेळी केली होती. आपला चांगला फॉर्म कायम राखत त्याने दुसऱ्या सामन्यात ७९ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६६ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळताना १० हजार धावांचा टप्पा पार केला. त्याने आपल्या १९० व्या डावात या विक्रमाला गवसणी घातली. त्याच्याआधी केवळ रिकी पॉन्टिंगने ही कामगिरी केली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळताना पॉन्टिंगने ३३० डावांमध्ये १२,६६२ धावा फटकावल्या होत्या.

४९० दिवसांपूर्वी अखेरचे शतक 

कोहलीने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चांगली फलंदाजी केली असली तरी त्याला पुन्हा एकदा शतक करता आले नाही. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ७० शतके केली आहे. मात्र, त्याचे अखेरचे शतक तब्बल ४९० दिवसांपूर्वी आले होते. त्याने २२ नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात १३६ धावांची खेळी केली होती.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -