घरक्रीडामैदानाबाहेरही कोहली टाकणार धोनीला मागे !

मैदानाबाहेरही कोहली टाकणार धोनीला मागे !

Subscribe

विराट कोहली लवकरच धोनीचा सर्वाधिक कमाईचा विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानात नवेनवे विक्रम करत असतो. तर तो मैदानाबाहेरही विक्रम करण्यात मागे नसतो. धावांचा डोंगर उभारणारा कोहली कमाईच्या बाबतीत देखील मागे नाही. फोर्ब्सच्या २०१८ च्या १०० सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत कोहली ८३ व्या स्थानावर होता. या यादीत असणारा तो एकमेव भारतीय खेळाडू होता. त्याची मागील एका वर्षातील कमाई २४ मिलियन डॉलर म्हणजेच १७० कोटी रुपये इतकी होती. पण आता कोहली लवकरच धोनीचा सर्वाधिक कमाईचा विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे. धोनीने २०१५ मध्ये ३१ मिलियन डॉलरची कमाई केली होती. भारतीय खेळाडूने एका वर्षात केलेली ही सर्वाधिक कमाई होती.

खेळांमधील सर्वात लोकप्रिय चेहरा  

विराट कोहली सध्या २१ कंपन्यांच्या जाहिराती करतो. तो प्यूमा, पेप्सी, ऑडी, टीसॉट यांसारख्या मोठ्या आणि प्रचलित कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. तसेच तो भारतीय खेळांमधील सर्वात लोकप्रिय चेहरा आहे. युवकांमध्ये त्याचा नेहमीच बोलबाला असतो. याचा फायदा त्याला सोशल मीडियावरील पोस्टवरून कमाई करण्यासाठी होतो. त्याला इंस्टाग्रामवर एका प्रमोशनल पोस्टसाठी ८२ लाख रुपये मिळतात. त्यामुळे दिवसेंदिवस त्याची कमाई वाढत चालली आहे आणि भविष्यात तो धोनीला मागे टाकत एका वर्षात सर्वाधिक कमाई करणारा भारतीय खेळाडू बनण्याची शक्यता आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -