घरमहाराष्ट्रलग्नाचे आमिष दाखवून शिक्षकाने युवतीवर केला बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून शिक्षकाने युवतीवर केला बलात्कार

Subscribe

नगर शहराजवळ एमआयडीसी परिसरात राहाणाऱ्या एका युवतीला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे.

नगर शहराजवळ एमआयडीसी परिसरात राहाणाऱ्या एका युवतीला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित पिडीत युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीसांनी संगमनेर तालुक्यातील एका शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच संबंधित शिक्षक फरार झाला आहे. प्रकाश कानवडे (४३) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

हेही वाचा – बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यावर पीएसआयने केली आत्महत्या

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार कानवडेला दुसरे लग्न करण्याची इच्छा होती. दरम्यानच्या काळात त्याची या पिडीत युवती बरोबर ओळख झाली. प्रकाशने या तरूणीला तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. १० मे ते ४ ऑक्टोबर या कालावधीत ही घटना घडली. शारिरीक संबंध होऊन देखील आरोपी प्रकाश कानवडे पिडीत युवती बरोबर लग्न करण्यासाठी सातत्याने टाळाटाळ करीत होता. त्यामुळे अखेरीस या तरूणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रकाश विरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलीसांनी कानवडेच्या विरूध्द तातडीने गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी प्रकरणाचा तपास करीत आहेत. मात्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आरोपी प्रकाश गावातून फरार झाला आहे.


हेही वाचा – मुंंबईत मनोरूग्ण तरूणीवर बलात्कार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -