घरक्रीडाविंडीजचे लक्ष्य मालिका विजयाचे; इंग्लंडविरुद्ध दुसरी कसोटी आजपासून

विंडीजचे लक्ष्य मालिका विजयाचे; इंग्लंडविरुद्ध दुसरी कसोटी आजपासून

Subscribe

मालिकेतील दुसरी कसोटी गुरुवारपासून (आज) मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड स्टेडियममध्ये रंगणार आहे.

शॅनन गेब्रियलची गोलंदाज आणि चौथ्या डावात जर्मेन ब्लॅकवूडची संयमी खेळी यामुळे वेस्ट इंडिजने पहिल्या कसोटीत इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आता मालिकेतील दुसरी कसोटी गुरुवारपासून (आज) मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड स्टेडियममध्ये रंगणार असून हा सामना जिंकत मालिका जिंकण्याचे जेसन होल्डरच्या विंडीजचे लक्ष्य असेल. परंतु, कर्णधार जो रुटच्या पुनरागमनामुळे इंग्लंडचा संघ मजबूत झाला आहे आणि ते सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करतील.

इंग्लंडला रुटची उणीव भासली

कोरोनामुळे मार्चपासून क्रिकेट बंद होते. परंतु, मागील आठवड्यात इंग्लंड आणि विंडीज यांच्यातील पहिल्या कसोटीपासून पुन्हा क्रिकेटला सुरुवात झाली. इंग्लंडचा कर्णधार आणि प्रमुख फलंदाज रुट कौटुंबिक कारणास्तव या सामन्यात खेळला नाही. इंग्लंडला रुटची उणीव नक्कीच भासली. इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या २०४ धावांत आटोपला आणि विंडीजने याचे उत्तर देताना ३१८ धावा करत ११४ धावांची आघाडी घेतली. यानंतर इंग्लंडला पुनरागमन करणे अवघड झाले आणि त्यांनी सामना गमावला. दुसऱ्या कसोटीत मात्र रुट संघात परतणार असून जो डेंलीची जागा घेईल.

- Advertisement -

विंडीज संघात बदल होण्याची शक्यता कमी

रुट संघात परतल्याने इंग्लंडची फलंदाजी भक्कम झाली आहे. तसेच गोलंदाजांमध्ये अनुभवी स्टुअर्ट ब्रॉडचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विंडीज संघात बदल होण्याची शक्यता कमीच आहे. विंडीजच्या गोलंदाजांनी खासकरून सामनावीर गेब्रियल (९ बळी) आणि कर्णधार होल्डर (७ बळी) यांनी पहिल्या कसोटीत अप्रतिम कामगिरी केली. आता ते या कामगिरीची पुनरावृत्ती करतील अशी विंडीजला आशा असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -