घरक्रीडाजागतिक कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या वेताळ शेळके, पृथ्वीराज पाटील यांची निवड

जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या वेताळ शेळके, पृथ्वीराज पाटील यांची निवड

Subscribe

१६ ते २२ ऑगस्ट या कालावधीत रशियातील उफा येथे होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्राचे हे दोन कुस्तीपटू भारताचे प्रतिनिधित्व करतील.

रशिया येथे होणाऱ्या जागतिक ज्युनियर फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या वेताळ शेळके आणि पृथ्वीराज पाटील या दोघांची निवड झाली आहे. १६ ते २२ ऑगस्ट या कालावधीत रशियातील उफा येथे होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्राचे हे दोन कुस्तीपटू भारताचे प्रतिनिधित्व करतील. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये झालेल्या निवड चाचणीच्या ८६ किलो वजनी गटात वेताळ शेळके आणि ९२ किलो वजनी गटात पृथ्वीराज पाटील यांनी हरयाणा, दिल्ली व पंजाबच्या कुस्तीपटूंवर मात केली.

निवड चाचणी स्पर्धेत केलेल्या या दर्जेदार कामगिरीमुळेच या दोघांची ज्युनियर फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. वेताळ शेळके (सोलापूर) हा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल (कात्रज) येथे अर्जुन पुरस्कारप्राप्त काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. तर पृथ्वीराज पाटीलला (कोल्हापूर) शाहू कुस्ती केंद्र (शिंगणापूर) येथे वस्ताद जालिंदर मुंडे आणि माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू शिवाजी पाटील यांचे मार्गदर्शन लाभते.

- Advertisement -

जागतिक स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल वेताळ आणि पृथ्वीराज या दोघांचे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेव मोहिते व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख उपमहाराष्ट्र केसरी संपत साळुंखे यांनी अभिनंदन केले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -