घरक्रीडाIND VS AUS : शिखर धवन चमकला; भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियासमोर दणकेबाज विजय

IND VS AUS : शिखर धवन चमकला; भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियासमोर दणकेबाज विजय

Subscribe

सलामीवीर शिखर धवनचे शतक तसेच जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ३६ धावांनी पराभव केला. हा भारताचा या विश्वचषकातील सलग दुसरा विजय होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ विकेट गमावत ३५२ धावांचा डोंगर उभारला होता. ही भारताची विश्वचषकातील चौथी सर्वोच्च धावसंख्या होती. याला प्रतिउत्तर देताना ऑस्ट्रेलियाचा डाव ३१६ धावांत संपुष्टात आला.

भारताने दिलेल्या ३५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेविड वॉर्नर आणि कर्णधार अॅरॉन फिंच यांनी डावाची सावध सुरुवात केली. बुमराह आणि भुवनेश्वर यांच्या चांगल्या गोलंदाजीमुळे त्यांना पहिल्या ७ षटकांत केवळ १९ धावाच करता आल्या. मात्र, हार्दिक पांड्या गोलंदाजीला येताच त्यांनी आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली. या दोघांनी १३ षटकांत ६१ धावा केल्यानंतर केदार जाधवने फिंचला ३६ धावांवर धावचीत केले. यानंतरही वॉर्नरने आपली संयमी फलंदाजी सुरु ठेवत ७७ चेंडूत आपले एकदिवसीय क्रिकेटमधील १९वे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, ५६ धावांवर त्याला युजवेंद्र चहलने भुवनेश्वरकरवी झेलबाद केले. स्टिव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा यांनी झुंजार फलंदाजी केली. मागील सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या स्मिथने या सामन्यात ६० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने आणि ख्वाजाने तिसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. ही जोडी फोडण्याची गरज असल्याने कर्णधार कोहलीने भरवशाच्या बुमराहला गोलंदाजीसाठी बोलावले आणि त्याने आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थकी लावत ख्वाजाला ४२ धावांवर माघारी पाठवले. यानंतर भुवनेश्वरने स्मिथ (६९) आणि मार्कस स्टोइनिस (०) यांना एकाच षटकात बाद केले. तीन विकेट झटपट गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाची २ बाद २०२ वरून ५ बाद २३८ अशी अवस्था झाली. ग्लेन मॅक्सवेल (१४ चेंडूत २८) आणि यष्टीरक्षक-फलंदाज अॅलेक्स कॅरी (३५ चेंडूत नाबाद ५५) यांनी आक्रमक फलंदाजी केली. मात्र, त्यांना इतरांची साथ न लाभल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव ५०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ३१६ धावांवर आटोपला.

- Advertisement -

भारतीय फलंदाजांच्या जबरदस्त फलंदाजीमुळे भारताने ऑस्ट्रेल्याला ३५३ धावांचे आव्हान दिले आहे. भारताने ५० षटकांत ५ बाद ३५२ धावा केल्या आहेत. यामध्ये सलामीवीर रोहित शर्मा, शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांची  भूमिका महत्त्वाची ठरली. रोहित शर्माने संयमाने सुरुवात करत शिखर धवन सोबत पहिल्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने आपले अर्धशतक साजरी केल्यानंतर तो झेलबाद झाला. त्यानंतर शिखर धवनने कर्णधार विराट कोहली सोबत डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. यादरम्यान शिखर धवनने आपले दमदार शतक पूर्ण केले. परंतु, उंच फटकार मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. त्याने १०९ चेंडूत ११७ धावा केल्या. यानंतर विराट केहलीने देखील अर्धशतक पूर्ण केले. धवन नंतर आलेल्या हार्दिक पांड्याने आक्रमक फलंदाजी केली. परंतु, हाच आक्रमकपणा त्यांच्या अंगाशी आला. कारण उंच फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. यामुळे फक्त २ धावांसाठी त्याचे अर्धशतक हुकले. त्यानंतर धोनीसोबत डाव सावरत विराट कोहलीने संयमाने आपली फलंदाजी सुरु ठेवली. धोनीने आक्रमक फलंदाजी केली आणि उंच फटका मारण्याच्या नादात धोनी झेलबाद झाला. त्याने १४ चेंडूत १७ धावा केल्या. यानंतर कर्णधार विराट कोहली देखील ८२ धावांवर बाद झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -