घरटेक-वेकApple नाही तर जगातील सर्वात आवडता 'हा' स्मार्टफोन ब्रँड

Apple नाही तर जगातील सर्वात आवडता ‘हा’ स्मार्टफोन ब्रँड

Subscribe

जगातील सर्वात आवडता स्मार्टफोन ब्रँड अॅपल (Apple) असल्याचे म्हटले जाते. परंतु २०२१च्या तिसऱ्या तिमाहीतील आकडे काही वेगळीच गोष्ट सांगत आहे. मार्केट रिसर्च फर्म Counterpointच्या रिपोर्टनुसार, जागतिक स्मार्टफोन शिपमेंटबद्दल बोलायचे झाले तर २०२१च्या तिसऱ्या तिमाहीत अॅपल आणि शाओमीला (Xiaomi) मागे टाकत सॅमसंग (Samsung) एक नंबरचे स्थान मिळवले आहे.

२०२१च्या तिसऱ्या तिमाहीत सॅमसंगने सर्वात जास्त २९ टक्के स्मार्टफोनचे ग्लोबली शिपमेंट केले आहे. तर १४ टक्के शिपमेंटसोबत अॅपलला दुसऱ्या नंबरचे स्थान मिळाले आहे. परंतु सॅमसंग आणि अॅपलमध्ये जवळपास ६ टक्क्यांचा फरक आहे. तर अॅपल आणि शाओमीमध्ये १ टक्क्याचा फरक आहे. शाओमीने तिसऱ्या तिमाहीत १३ टक्के स्मार्टफोन शिपमेंट केले आहे. तर विवो (Vivo) आणि ओप्पोने (Oppo) १०-१० टक्क्यांसोबत चौथ्या क्रमांचे स्थान मिळवले आहे. तसेच रिअलमी ५ टक्क्यांसोबत पाचव्या स्थानावर आहे. शाओमीच्या शिपमेंटमध्ये जवळपास ५ टक्क्यांचा घसरण झाली आहे. रिपोर्टनुसार, जागतिक चिपसेटच्या कमतरतामुळे असे झाल्याचे म्हटले जात आहे.

स्मार्टफोन शिपमेंट मार्केट शेअर

  • Samsung – २९ टक्के
  • Apple – १४ टक्के
  • Xiaomi – १३ टक्के
  • Vivo – १० टक्के
  • Oppo – १० टक्के
  • Realme – ५ टक्के

कोणी किती यूनिटचे केले शिपमेंट?

  • Samsung – ६९.३ मिलियन यूनिट
  • Apple – ४८ मिलियन
  • Xiaomi – ४४.४ मिलियन
  • Realme – १६.२ मिलियन
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -