घरठाणेकेडीएमसी कर्मचार्‍यांना 18 हजार सानुग्रह अनुदान जाहीर!

केडीएमसी कर्मचार्‍यांना 18 हजार सानुग्रह अनुदान जाहीर!

Subscribe

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकारी वर्गास तसेच वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मचारी वर्गास रुपये 18 हजार सानुग्रह अनुदान यावर्षी देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. दीपावलीपूर्वी सानुग्रह अनुदान देण्यासाठी कर्मचारी संघटनांची बैठक घेण्यात आली होती.

त्याचप्रमाणे खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील महापालिका कर्मचारी वर्गास वाढीव बोनस देणेबाबत पत्रान्वये कळविले होते. गतवर्षी महापालिका कर्मचारी वर्गास रुपये 16,500 इतका सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. मात्र यावर्षी वर्ग1 व वर्ग2 च्या अधिकारी वर्गासही हे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. आपण स्वत: मात्र हे सानुग्रह अनुदान घेणार नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेत मुख्य लेखा परिक्षक लक्ष्मण पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण, सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे, विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -