घरठाणेभिवंडीत चोरट्यांकडून 28 तोळे सोने जप्त

भिवंडीत चोरट्यांकडून 28 तोळे सोने जप्त

Subscribe

भिवंडी शहरामध्ये मागील काही दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असताना पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी पोलिसांना आपापल्या क्षेत्रामध्ये गस्त वाढवून नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते. या कारवाईला यश आले असून भिवंडी शहर पोलिस ठाण्यातील गणेश हरणे आणि लहू गावित या दोघा पोलिसांनी पाठलाग करून अशा गुन्हेगारांना पकडून त्यांच्या ताब्यातून 8 लाख 61 हजार रुपये किंमतीचे 28 तोळे सोने व 50 हजार रुपये किमतीची एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त करून नऊ गुन्हे उघडकीस आणले आहे. सोनु गोविंद पाल (28) ,कमलाकर गपणत डोंगरे (36) आणि सहकारी स्वप्नील गजानन हरड असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

भिवंडी शहरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक देशमुख, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे व पोलिस निरीक्षक दीपक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई गणेश हरणे आणि लहू गावित हे पोलीस गस्त घालीत असताना पद्मानगर भागात दोघे संशयित दुचाकी वरून जाताना आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना अडवले. पैकी एका चोराने पोलिसांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून पळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला धाडसाने पकडले. चौकशी केल्यावर शहर पोलिस ठाणे हद्दीतील आठ आणि मानपाडा पोलिस ठाणे हद्दीतील एक अशा नऊ गुन्ह्यांची उकल केली. त्यांनी चोरी केलेल्या सोन्याचा तपास घेतला असता त्यांनी चोरलेले सोने आपला साथीदार स्वप्नील गजानन हरड यांच्या मार्फत नाशिक जिल्ह्यातील घोटी येथे श्री साईसंत ज्वेलर्स याला विकल्याचे कबूल केल्याने पोलिसांनी 8 लाख 61 हजार रुपये किमतीचे 28 तोळे सोने आणि गुन्हे करण्यासाठी वापरलेली 50 हजार किंमतीची दुचाकी जप्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -