घरठाणेशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन

Subscribe

ठाणे । राज्य सरकारच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्‍या ज्येष्ठ क्रीडा महर्षींकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

सरकारने 29 डिसेंबर, 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली, 2023 ची नियमावली विहित केली आहे. या नियमावलीनुसार सन 2022-23 या वर्षाच्या पुरस्काराकरीता राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि साहसी यांच्याद्वारा अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज सादर करणार्‍या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील दिलेल्या लिंकवर 8 जानेवारी ते 22 जानेवारी, 2024 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी सूवर्णा बारटक्के यांनी आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -