घरठाणेShahapur:लग्नविधींमध्ये मोलाची भूमिका बनवणारी धवलारीन आजही उपेक्षित

Shahapur:लग्नविधींमध्ये मोलाची भूमिका बनवणारी धवलारीन आजही उपेक्षित

Subscribe

गायनातून देवदेवतांचे नामस्मरण करून संस्कृती व परंपरा जपणार्‍या वयोवृद्ध धवलारीनी देखील आहेत. त्यांचीही सेवा आजही उपेक्षित असून नवीन पिढीला न रुचणारी आहे.

शहापूर : लग्न समारंभात विविध समाजाचे बांधव आपापल्या रूढी परंपरा आपल्या देवदेवतांचे विधिवत पूजन करून लग्न कार्य सिद्धीस नेत असतात. नुकताच त्यांच्या समाजाप्रती असलेले योगदान लक्षात घेऊन शहापूर तालुक्यातील धवलारीन महिलांचा शोध घेऊन वृषाली महिला संस्थेकडून या धवलारीन वृद्ध महिलांचा कृतज्ञता सोहळा पार पडला.

लग्न समारंभामध्ये परिस्थितीनुसार खर्च नागरिक करीत असतात. मात्र लग्न समारंभामध्ये लग्नाच्या तिसर्‍या दिवसाअगोदर लग्न कार्याच्या उटणे, हळदी, तेलं तसेच पाठवणीपर्यंत तीन दिवस देवदेवतांना आपल्या गायनातून स्तवन, नमन करून धवलारीन महिला लग्न समारंभात हयातभर निस्वार्थ भावनेने योगदान देतांना दिसून येतात. लग्न समारंभामध्ये कोरोना काळात अनेकांनी लग्न समारंभातील खर्चाला आळा घालून मोजक्या पाहुण्या मंडळींबरोबर लग्न समारंभ उरकले. कोरोना काळानंतर पुन्हा एकदा लग्न समारंभाची धूम आपणांस पाहावयास मिळत आहे. यामध्ये लग्न मंडप, वाजंत्री, निमंत्रण पत्रिका, मानपणाचे कपडे, नवरा नवरी साठी दागिने या रूढी आणि परंपरा जपण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होत आहे. लग्न समारंभामध्ये जेवढा मान ब्राह्मणाला दिला जातो. तेवढाच मान उटणे, हळदी, तेलं यामध्ये आपल्या गायनातून देवदेवतांचे नामस्मरण करून संस्कृती व परंपरा जपणार्‍या वयोवृद्ध धवलारीनी देखील आहेत. त्यांचीही सेवा आजही उपेक्षित असून नवीन पिढीला न रुचणारी आहे. धवल गीत गाणार्‍या अनेक वयोवृद्ध महिला काळाच्या पडद्याआड गेल्या असून नवीन पिढीमध्ये ही संस्कृती आणि परंपरा लोप होतांना दिसून येत आहे.

- Advertisement -

गेल्या ५० वर्षांपासून लग्न समारंभातील धवली गाऊन संस्कृती व परंपरा आणि देवीदेवतांचा मान ठेवला. निर्विघ्न लग्न समारंभ पार पाडले. आत्ताच्या मुलींना या गोष्टीची लाज वाटत आहे. त्यामुळे भावी काळात ही परंपरा संपुष्टात येईल.

– डोंगरे आजी, शेरे, धवलारीन, शहापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -