घरठाणेघरघंटी वाटप प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल

घरघंटी वाटप प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल

Subscribe

उल्हासनगर । लोकसभा निवडणुकीचे पडघम सुरू होण्या पूर्वी खुलेआम आचार संहितेचे उल्लंघन करताना महापालिकेची शाळा निवडणूक विभागासह अन्य ठिकाणाहून घरघंटी आणि शिलाई मशीनचे वाटप होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याविषयी महापालिका अधिकार्‍यांच्या तक्रारीनंतर मध्यवर्ती पोलिसांनी एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उल्हासनगर महापालिका महिला आणि बालकल्याण विभागाच्यावतीने प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याणकारी योजने अंतर्गत तीन हजार 298 शिलाई मशीन आणि घरघंटीसाठी महिलांकडून अर्ज मागवण्यात आले होते. दरम्यान अर्जाची छाननी करून पात्रता यादीतील अर्जाची लॉटरी काढण्यात आली. त्या लॉटरीतील पात्र महिलांची यादी प्रसिद्ध करून 13 मार्च रोजी यंत्र वाटपाचा प्रातिनिधिक स्वरूपाचा कार्यक्रम प्रांतकार्यालयच्या प्रांगणात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

ही प्रक्रिया सुरु असताना 16 मार्चला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने, शिलाई मशीन आणि घरघंटी वाटपाचा कार्यक्रम तत्काळ थांबविण्यात आला. त्यानंतरही महापालिका शाळा क्रमांक 29 सह अन्य ठिकाणाहून महिलांना शिलाई मशीन आणि घरघंटी यंत्र वाटप होत असल्याच्या प्रकार सोशल माध्यमातून उघड झाला. मनसे सह अन्य सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याप्रकाराची दखल घेत महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा यांनी मनपा आयुक्तांना याबाबत सविस्तर माहिती मागितली . शेवटी मनपा आयुक्त यांच्या निर्देशनुसार महिला व बालकल्याण विभागाचे प्रमुख रितेश रंगारी यांनी पोलिसात तक्रार केली त्यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात शिलाई मशीन व घरघंटी वाटप केल्या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -