घरthaneDiwali 2023: दिवाळी पहाट निमित्ताने ठाण्यात वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा करा...

Diwali 2023: दिवाळी पहाट निमित्ताने ठाण्यात वाहतुकीत बदल; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर

Subscribe

दिवाळी पहाटच्या निमित्ताने ठाण्यातील नौपाडा, राम मारुती रोड आणि मासुंदा तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात सांस्क़ृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे होणारी कोंडी लक्षात घेता रविवार, 12 नोव्हेंबर रोजी या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

ठाणे: सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या ठाणे शहरात दिवाळी पहाट कार्यक्रम दरवर्षी अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणाई सहभागी होत असते. याच दिवाळी पहाटच्या निमित्ताने ठाण्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. (Diwali 2023 Traffic changes in Thane on Diwali Pahat Use these alternative routes pup)

दिवाळी पहाटच्या निमित्ताने ठाण्यातील नौपाडा, राम मारुती रोड आणि मासुंदा तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात सांस्क़ृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे होणारी कोंडी लक्षात घेता रविवार, 12 नोव्हेंबर रोजी या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

दिवाळीच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात तरुणाईचे जत्थे मासुंदा तलाव आणि राम मारुती रोड परिसरात येतात. या ठिकाणी विविध राजकीय पक्षांकडून रंगमंच उभारून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा जांभळी नाका येथील चिंतामणई चौक सर्कल, राजावंत ज्वेलर्ससमोर, न्यू इंग्लिश शाळेजवळ, पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स चौक व शिवप्रसाद उपहारगृहाजवळ सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचे वाहतूक शाखेने जाहीर केलेल्या अधिसूचनेत नमूद केलं आहे. त्यामुळे या भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

पर्यायी मार्गांचा करा वापर

  • डॉक्टर मूस चौक येथून गडकरी सर्कलच्या दिशेने होणाऱ्या वाहनांना डॉक्टर मूस चौक येथे प्रवेशबंदी. ही वाहने टॉवर नाका, टेंभी नाका मार्गे जातील.
  • गडकरी सर्कलकडून डॉक्टर मूस चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी. ही वाहनं गडकरी सर्कल येथून अल्मेडा चौक, वंदना टी पॉईंट, तीन पेट्रोल पंप, हरिनिवासमार्गे जातील.
  • घंटाळी साईनाथ चौक येथून पु.ना. गाडगीळ चौकाकडे येणाऱ्या वाहनांना श्रद्धा वडापाव दुकानाजवळ प्रवेशबंदी ही वाहने घंटाळी देवी पथमार्गे पुढे जातील.
  • गजानन महाराज चौक ते तीन पेट्रोल पंप रस्त्यावर काका सोहनी पथ गल्लीतून पु. ना. गाडगीळ चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी. ही वाहनं तीन पेट्रोल पंप, हरिनिवास मार्गे जातील राजमाता वडापाव सेंटर येथून गजानन महाराज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी. ही वाहनं गोखले रोडवरून पुढे जातील.
  • संबंधित वाहतूक बदल रविवारी, 12 नोव्हेबर रोजी सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत अंमलात राहणार असून या बदलांमधून अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळण्यात आल्याचं ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी अधिसूचनेद्वारे स्पष्ट केलं आहे.

(हेही वाचा:  उल्हासनगर महापालिकेला केंद्राकडून शंभर बसेस मंजूर )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -