घरठाणेविकास आराखड्याच्या हरकती दाखल करा

विकास आराखड्याच्या हरकती दाखल करा

Subscribe

भिवंडी आर्किटेक्ट अँड इंजीनियर्स असोसिएशनचे आवाहन

येत्या वीस वर्षासाठी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचा नवीन विकास आराखडा मनपा आयुक्त आयुक्त अजय वैद्य यांनी मागील महिन्यात प्रसिद्ध केला असून हा आराखडा नागरिकांना पाहण्यासाठी मनपाच्या मुख्य कार्यालयात ठेवला असून त्यावर हरकती दाखल करण्याचे त्यांनी आवाहन केले. नागरिकांना आपल्या हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत दहा नोव्हेंबर पर्यंत असून तत्पूर्वी नागरिकांनी आपल्या सूचना व हरकती वेळेत दाखल कराव्यात,असे आवाहन भिवंडी आर्किटेक्ट अँड इंजीनियर्स एसोसिएशनच्या वतीने अध्यक्ष जलाल अंसारी व सरचिटणीस जावेद आज़मी यांनी केले आहे.

विकास आराखडा हा शहराचा चेहरा असून पुढील वीस वर्षांसाठी ज्या नवीन विकास योजना व प्रयोजन तयार केले आहे,त्याचे सर्वांगीण चित्र नागरिकांसमोर आणि शासनासमोर ठेवले आहे. या आराखड्यानुसार शहराचा नियोजनबध्द विकास शक्य होत असतो तर शहर सुंदर होण्यास ही हातभार लागतो. त्यासाठी विकास आराखड्यात नव्याने काही जागांवर आरक्षण दाखल केले आहे. शहराच्या विकास योजनांमध्ये आरक्षित केलेले भूखंड आवश्यक आहेत की अनावश्यक आहेत,रस्ते रुंदीकरण संदर्भातील आवश्यकता या बाबत नागरिकांनी आपल्या सूचना हरकती वेळेत दाखल केल्यास त्यांचा विचार होऊ शकतो. त्यासाठी नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करीत आर्किटेक्ट अँड इंजीनियर्स एसोसिएशनचे अध्यक्ष जलाल अंसारी व सरचिटणीस जावेद आज़मी यांनी या कामी नागरिकांना आवश्यक ते तांत्रिक माहिती सहाय्य करण्यास एसोसिएशन तयार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -