घरठाणेसर्प, विंचूदंशाने दगावलेल्यांना शासकिय मदतीचा ठेंगा

सर्प, विंचूदंशाने दगावलेल्यांना शासकिय मदतीचा ठेंगा

Subscribe

तालुक्यातील 241 व्यक्तींना सर्प, विंचू दंश

गरीबांच्या जगण्याला जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही किंमत नाही, असा संताप आदिवासी कातकरी कुंटूबांतील सर्पदंशाने दोन बळी गेलेल्या मृतांचे नातेवाईक किसन हिलम (६८) यांनी केला आहे. यातील सरकारी मदत कार्यालयात हेलपाटे मारूनही मिळत नसल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. तालुक्यातील शेकडो अदिवासी वाड्या पाड्यांना पावसाळयात रस्त्या अभावी ‘डोली’ किंवा उचलून खांद्यांचा आधार घ्यावा लागतो. रुग्ण, गरोदर महिला, सर्पदंश, विंचूदंश रुग्णांना वेळेवर उपचार मिळाला नाही तर उपचारा अभावी त्यांचा रस्त्यांतच करूण अंत होतो. सर्पदंश आणि विंचूदंशात मृत पावलेल्या व्यक्तींना सरकारकडून ‘गोपिनाथ मुंडे मदत सेवा’ या योजनेच्या नावाखाली मदत जाहीर केली असली, तरी प्रत्यक्षात अशा व्यक्तींचे नातेवाईक पदरमोड करीत कागदपत्रे गोळा करतात. परंतु काहीही शासकीय मदत मिळत नसल्याचा अनुभव व्यक्त केला जात आहे.

मुरबाड तालुक्यात सन 2021 ते 2023 दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र किशोर, शिवळे, सरळगांव, मोरोशी , शिरोशी, धसई, तुळई नारिवली या प्राथमिक आरोग्य केंद्रावर 241 नागरिकांना सर्प आणि विंचू दंश झाल्याच्या नोंदी आहेत. यापैकी शिरोशी एक आणि धसईतील दोन व्यक्ती मृत झाल्याच्या नोंदी आहेत. मृतांची माहिती जिल्हा आरोग्य केद्रांकडे वर्ग केली जात असते. या बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगणे यांना संपर्क केला असता ‘तपासून सांगतो’ असे त्यांनी सांगितले. अनेक नागरिक या सर्पदंशाने व विंचूदंशाने बळी गेले आहेत. यात आदिवासी बांधवांची संख्या अधिक असून या दगावलेल्या बहुतांश व्यक्तींच्या नातेवाईकांना पुरेशी शासकिय मदत मिळालेली नाही. सन 2022 ला ओजिवले कातकर वाडीतील 8 ऑगस्ट रोजी सरपंच बारकाबाई किसन हिलम(55) आणि 5 सप्टेंबरला जावई सुभाष वाघ (35)यांचा सर्पदंशाने आणि रस्त्याअभावी बळी गेला. मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळते म्हणून किसन हिलम (65)यांनी सहा हजार रुपये पदरमोड करून कागद पत्रे जमा केले. त्यात आधारकर्ड, पॅनकार्ड, सातबारा, मृत्यूचा दाखला अशी माहिती नागपूर, पुणे आणि ठाणे कृषी विभागाकडे पुरावे सादर करून तीन वर्ष हेलपाटे मारून देखील आजपर्यंत या व अशा अनेकांना तीन लाख रुपये शासकीय मदत देण्यात आली नसल्याची संतप्त भावना वयोवृद्ध नातलग किसन हिलम यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -