घरठाणेनुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यांच्या प्रतिक्षेत

नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यांच्या प्रतिक्षेत

Subscribe

अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या शेतमालाचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाला दिले आहेत. मात्र आतापर्यंत प्रशासन ढिम्म गतीने कार्यवाही करत असल्याचा आरोप येथील एका माजी सरपंचाने केला आहे. मात्र पावसापासून भाताचे संरक्षण करण्यासाठी शेतकर्‍यांना प्लास्टिकचा आधार घ्यावा लागत आहे. अवकाळी पावसात शेतकरी हवालदिल झाल्याने नुकसान झालेल्या भाताचे आणि मालमत्तेचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यानी दिले आहेत. मात्र साखरे महसूल सजेत येणार्‍या साखरे, धारगांव, कासगांव, संगमगाव, अस्कोत, किसळ, पारगांव आणि चारवाड्या असलेल्या या गावांतील शेकडो शेतकर्‍यांचे अवकाळीने पावसाने नुकसान केले आहे.

ही नुकसान पंचनामे करण्याची जबाबदारी कृषी विभागाची असली तरी सातबारा सह शेतीचे कागदपत्रक देण्याची जबबदारी या सजेवर असलेल्या तलाठी यांची आहे. त्यांची भेट होत नसल्याने तसेच तलाठी चावडीत येत नसल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपतालुकाप्रमुख आमि माजी सरपंच जयवंत पडवळ यांनी केला आहे. त्यामुळे वेळीच पंचनामे न झाल्यास नुकसानग्रस्त शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहाण्याची भीती आहे.
काही शेतकर्‍यांनी मुरबाड तहसीलदारांना त्यांच्या मोबाईल दूरध्वनीवर संपर्क केला असता त्यांचा मोबाईल फोन नेहमी बंद असतो. शेवटी प्रांत अधिकारी दौंड यांना दूरध्वनीवरून संपर्क करून पंचनामे करण्याबाबत विनंती केली आहे. भाताचे पिक खळ्यात येऊन पडले आणि पुन्हा पा़ऊस सुरू झाला, तसेच पावसाचा जोर वाढल्याने खळ्यातील भारे आणि भात पेंढा भिजून वाया जाऊ नये म्हणून शेतकर्‍यांना स्वखर्चाने प्लास्टिक आणून भाताचे भारे-पेंढा झाकून ठेवावा लागला आहे. शेतकर्‍यांची प्लास्टीकवर मदार असल्याने प्लास्टीकला सुद्धा मागणी वाढली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -