घरठाणेबससेवा लवकर सुरू न केल्यास परिवहन मुख्यालयाला टाळे ठोकू

बससेवा लवकर सुरू न केल्यास परिवहन मुख्यालयाला टाळे ठोकू

Subscribe

शिवसेना उपनेते विजय साळवी यांचा इशारा

केडीएमटी परिवहन विभागाची दुरवस्था पाहून मंगळवारी उद्धव गटाच्या शिवसैनिकांनी अचानक परिवहन मुख्यालयावर धडक देत परिवहन प्रशासक दीपक सावंत यांना जाब विचारला. शिवसेनेचे उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी परिवहन प्रशासक सावंत यांच्याशी झालेल्या चर्चेत मोहणे आणि रिंगरूटची बससेवा 10 ते 15 दिवसांत सुरू न केल्यास परिवहन मुख्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. दोन दिवसांत वसंत व्हॅली आगाराचा फलक दुरुस्त न केल्यास डेपो पेटवून देऊ, असे शिवसेनेचे नेते आणि माजी परिवहन सदस्य रवी कपोते यांनी सांगितले. परिवहन प्रशासकाशी झालेल्या चर्चेदरम्यान शिवसैनिकांनी बसेसची दुरवस्था आणि उत्पन्नाबाबत खंत व्यक्त केली.

पाच वर्षांनंतरही बदल नाही
शिवसेनेचे उपनेते विजय साळवी म्हणाले की, 2017-18 मध्ये केडीएमटीचे उत्पन्न प्रतिदिन 5 लाख रुपये होते, 5 वर्षांनंतरही ते 5 लाख रुपयेच आहे. त्यामुळे परिवहन विभागाची प्रगती काय झाली? साळवी म्हणाले की, शहरवासीयांसाठी बसची व्यवस्था नाही, तसेच लांब पल्ल्याच्या बसेस चालवल्या जात आहेत. शहरप्रमुख सचिन बसरे म्हणाले की, वाहतुकीची स्थिती इतकी बिकट झाली आहे की, लोकांना शहरात ये-जा करण्यासाठी बससेवा नाहीत. रिक्षाचालक याचा फायदा घेत लोकांकडून मनमानी भाडे आकारत आहेत. महिलांसाठी चालवल्या जाणार्‍या तेजस्विनी बसेसचा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळा परब म्हणाले की, गेल्या वर्षी चार तेजस्विनी बसेस सुरू झाल्या, मात्र अवघ्या वर्षभरात तीन बसेस खराब झाल्या आणि आगारात सडल्या. रस्त्यावर एकच बस दिसत आहे. चर्चेदरम्यान माजी परिवहन सभापती विजय काटकर, शिवसेना नेते दत्ता खंडागळे, माजी नगरसेवक अरविंद पोटे, महिला जिल्हा संघटक विजया पोटे, रुपेश भोईर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

- Advertisement -

रिंगरूट आणि मोहने कॉलनीपर्यंत नियमित बससेवा सुरू करण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील. याबाबत बस डेपोच्या अधिकार्‍यांना कळविण्यात आले आहे. या दोन्ही बससेवा लवकरच शहरवासीयांसाठी सुरू होणार आहेत.
-दीपक सावंत, परिवहन प्रशासक, कल्याण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -