घरठाणेरेल्वे रुळांलगतच्या झोपडीधारकांना धमकी?

रेल्वे रुळांलगतच्या झोपडीधारकांना धमकी?

Subscribe

डॉ. जितेंद्र आव्हाडांचा रावसाहेब दानवेंवर गंभीर आरोप

जोपर्यंत रेल्वे रुळांलगतच्या झोपडीधारकांचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत कारवाई होणार नाही, असे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी कुमार यांनी दिलेले असताना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे या आश्वासनाला केराची टोपली दाखवत आहेत. त्यांच्या आदेशानुसार रेल्वे अधिकारी दिवा परिसरातील रेल्वे रुळांलगतच्या झोपडीधारकांना घरे खाली करण्यासाठी धमकावत असल्याचा आरोप गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

ठाण्याच्या मध्य रेल्वे मार्गावरील कळवा-मुंब्रा-दिवापासून ते थेट कल्याण-कर्जतपर्यंत रेल्वे लाईन शेजारी असलेली घरे हटविण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिले होते. तशी कारवाईही रेल्वे अधिकार्‍यांनी सुरू केली होती. मात्र, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आंदोलनानंतर व रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या निवेदनानंतर ही कारवाई मागे घेण्यात आली. दिव्याच्या पाचव्या आणि सहाव्या लाईनच्या उद्घाटनासाठी रेल्वेमंत्री अश्विनी कुमार, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे ठाण्यात आले असताना रहिवाशांचे योग्य ठिकाणी स्थलांतर केल्यानंतरच रेल्वेचा हा परिसर रिकामा करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनीकुमार यांनी दिले होते.

- Advertisement -

मात्र, मध्य रेल्वेच्या मार्गातील या रहिवाशांना शुक्रवारी रेल्वेचे अधिकारी घरे खाली करण्यासाठी धमकावत असल्याचे म्हणत गरीब की जान क्या जान नही होती शेठ? असा सवाल करत डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी उद्या रेल्वे बंद पडल्यास दोष देऊ नका, असा इशारा रेल्वेमंत्री अश्विनीकुमार, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -