घरठाणेLok Sabha 2024 : कल्याण मतदारसंघात ठाकरेंनीच आणला ट्विस्ट; दुसरा उमेदवार निवडणुकीच्या...

Lok Sabha 2024 : कल्याण मतदारसंघात ठाकरेंनीच आणला ट्विस्ट; दुसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Subscribe

कल्याण डोंबिवली मतदारसंघात रमेश जाधव यांनी ठाकरे गटाकडून भरला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून या मतदारसंघात श्रीकांत शिंदेंविरोधात दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

डोंबिवली : कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाची रणनीती ठरत नसून आता पक्षाने दोन उमेदवार जाहीर केले आहेत. शिंदेची शिवसेना व ठाकरेची शिवसेना यांच्यातील युद्ध दिवसांगणिक पेटू लागले आहे. मागील महिन्यात ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांचे नाव जाहीर करून स्थानिक उमेदवार दिल्याची बोंब उठविण्यात आली. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच, दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाने आपला अजून एक उमेदवार रिंगणात उतरवला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी महापौर रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. (Lok Sabha Election 2024 Ramesh Jadhav filed nomination form from Thackeray group in Kalyan Dombivli Constituency)

रमेश जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यामागे उद्धव ठाकरे यांची रणनीती काय? हे अद्याप समजू शकले नसले तरी पक्षाकडून आलेल्या आदेशाचे पालन करत मी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगतिले. तसेच अर्जात एखादी त्रुटी राहिली तर खबरदारी म्हणून मी अर्ज दाखल करत असून, गरज पडल्यास पक्षाकडून योग्य त्या उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म लावला जाईल असेही ते म्हणले.

- Advertisement -

एकीकडे वैशाली दरेकर यांच्या विरोधात पक्षातील अंतर्गत कार्यकर्त्यांची नाराजी तर दुसरीकडे सहयोगी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलून त्यांची ओढवलेली नाराजी याचा परिणाम म्हणून तर पक्षाने रमेश जाधव यांना अर्ज दाखल करण्याच्या सूचना केल्या असाव्यात, अशी संभाव्य शक्यता ही वर्तवली जात आहे. कारण खासदार शिंदे यांच्याबरोबर मनसे, राष्ट्रवादी, भाजपा आणि शिंदेची शिवसेना असा मोठा लवाजमा पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा होऊन पंधरा दिवसाचा कालावधी उलटून गेला असला तरी त्या एकट्या प्रचार करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत महिला आघाडीची फरसी संख्याही पाहायला मिळत नाही आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : उत्तर-मध्य मुंबईत एमआयएमची एन्ट्री; महायुती-मविआचे गणित बिघडणार?

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण लोकसभेसाठी स्थानिक भूमीपुत्र द्या अशी मागणी होत असताना वैशाली दरेकर यांचे नाव पुढे आले, परंतु ही गोष्ट उबाठा गटाच्या फारसी पचनी पडलेली नाही. त्यातच जुन्या जाणत्या शिवसैनिकांना डावलून दरेकरांना दिलेली उमेदवारी देखील उबाठा गटाच्या नाराजीचे कारण होते. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला देखील सोबत घेऊन वैशाली दरेकर काम करत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

या संदर्भात वैशाली दरेकरांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, प्रचार सुरू असून कार्यकर्ते काम करत असल्याचे त्यांनी म्हटले. वैशाली दरेकर यांच्यासोबत कार्यकर्ते प्रचार करताना दिसत नाहीत. तसेच मागील विधानसभा निवडणुकीतही शिवसेना ठाकरे गटाकडून सुभाष भोईर यांचे नाव जाहीर करून मागे घेण्यात आले होते आणि या मतदारसंघातमाजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र रमेश म्हात्रे यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता वैशाली दरेकर यांच्याबरोबरही असेच काही होणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : अभिजीत बिचुकलेंचे श्रीकांत शिंदेंना आव्हान, कल्याणमधून भरणार अर्ज


Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -