घरठाणेLok Sabha 2024: पवारांना भटकती आत्मा म्हणणं दुर्दैवी; आदित्य ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर

Lok Sabha 2024: पवारांना भटकती आत्मा म्हणणं दुर्दैवी; आदित्य ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर

Subscribe

आदित्य ठाकरे आज डोंबिवलीत आहेत. कल्याण-डोंबिवलीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

डोंबिवली: पुण्यातल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भटकती आत्मा असा उल्लेख करत शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं होतं. पंतप्रधान मोदींच्या या टीकेचा प्रतिवाद अनेक नेत्यांनी केला आहे. शरद पवार गटाच्या नेत्यांनी जशास तशी उत्तरं दिलीच आहेत. पण, आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भटकती आत्मा म्हणणं दुर्दैवी असल्याचं, त्यांनी म्हटलं आहे. (Lok Sabha Election 2024 Sharad Pawar Called Bhatakati Aatma is not good Aditya Thackeray s Reply on PM Modi Statement)

आदित्य ठाकरे आज डोंबिवलीत आहेत. कल्याण-डोंबिवलीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

- Advertisement -

काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

शरद पवारांसारख्या नेत्याला जे राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत, त्यांना असं भटकती आत्मा वगैरे म्हणणं फारच दुर्दैवी असल्याचं, आदित्य ठाकरे म्हणाले. हे बाहेरचे लोक आपल्या राज्यात येतात आणि आपल्यालाच नकली शिवसेना, भटकती आत्मा बोलतात. कोण आहेत हे लोक? आपल्याला हे सांगणारे कोण आहेत? असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसह,  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सुनावलं आहे.

ईडी, सीबीआय या भाजपाच्या शाखा

देशभरात भाजपाच्या विरोधकांवर ईडी-सीबीआयचा प्रयोग केला जात आहे. ईडी, सीबीआय या भाजपाच्या शाखा आहेत. निवडणूक आयोगही डोळे बंद करुन बसलं आहे. भाजपाला आपला पराभव दिसू लागला की ते धार्मिक मुद्यांवर बोलायला सुरुवात करतात. परंतु, यावेळी जनता त्यांना निवडून देणार नाही. मिंधे गट आणि भाजपाच्या मित्र पक्षांना जनता उभं करणार नाही, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

- Advertisement -

रोहित पवारांचाही हल्लाबोल

पंतप्रधान मोदींनी केलेल्या या टीकेनंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पलटवार केला आहे. रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्र हे आमचं शरीर म्हणजेच पंढरी आहे आणि विठ्ठल हा या पंढरीतला आत्मा आहे. म्हणूनच स्वत:चं आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येताच मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली, पण इथं येऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्याऐवजी त्यांना अस्थिर आत्मे दिसू लागले आहेत.

(हेही वाचा: Lok Sabha 2024: पवारांना भटकती आत्मा म्हणणं दुर्दैवी; आदित्य ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर)


Edited By- Prajakta Parab 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -