घरठाणेउल्हासनगरातील बोगस डॉक्टरांवर महापालिकेची नजर

उल्हासनगरातील बोगस डॉक्टरांवर महापालिकेची नजर

Subscribe

आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती

उल्हासनगरात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टर नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असून या बोगस डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आला आहे. या बोगस डॉक्टरांना शोधून काढण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाईसाठी उल्हासनगर महापालिकेने आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गुरुवारी नेमली. बोगस डॉक्टरां कडे कोणतीही आवश्यक पदवी शिक्षण नसताना ते रुग्णांवर उपचार करत आहेत.

या बोगस डॉक्टरांनी शहरातील बहुतांश झोपडपट्टी भागात आपली दुकाने थाटली आहेत. त्यांच्याकडे उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि इतर राज्यातून बोगस सर्टिफिकेट मिळवून महाराष्ट्रातील दुर्गम भागात अथवा झोपडपट्टीतील दाट वस्तीत आपला दवाखाना थाटून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. या बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी महाालिका आयुक्तांनी पुढाकार घेतला असून कारवाईसाठी समिती गठित केली आहे. या समितीची बैठक स्थायी समिती सभागृह येथे आयुक्त अजीज शेख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली होती. या सभेत झालेल्या चर्चेनुसार उल्हासनगर महापालिका कार्यक्षेत्रामध्ये वैद्यकीय पथक गठीत करुन पथका मार्फत नागरी आरोग्य केंद्रनिहाय सर्वेक्षण करण्यात आले. बोगस वैद्यकीय व्यावसाय करणारे डॉक्टर शोधून त्यांच्यावर नियमानुसार आणि कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई प्रस्तावित करण्यात यावी, असे निर्देश आयुक्त शेख यांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -