घरठाणेमहावीर जयंतीनिमित्त श्री ठाणे जैन महासंघाच्या रथयात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला झेंडा

महावीर जयंतीनिमित्त श्री ठाणे जैन महासंघाच्या रथयात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला झेंडा

Subscribe

ठाणे : महावीर जयंतीनिमित्त आज ठाण्यातील श्री ठाणा जैन महासंघाने आयोजित केलेल्या भव्य रथयात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून या यात्रेचा शुभारंभ केला. तसेच यानिमित्ताने जैन मुनींचे त्यांनी शुभआशीर्वाद घेताना जैन बांधवांशी त्यांनी संवाद साधला.

जैन मुनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आशीर्वाद देताना

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी भगवान महावीरांचे विचार आचरणात आणून मार्गक्रमण करणारा जैन समाज हा अत्यंत शांतताप्रिय समाज आहे, असे वक्तव्य केले. या समाजाने क्षमाशील वृत्ती जोपासून मानवजातीच्या कल्याणासाठी कार्यरत राहण्याला प्राधान्य दिले आहे. आज भगवान महावीरांच्या जयंतीदिनी त्यांचे हेच विचार आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरावे आशा शुभेच्छा सर्वांना देत असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

राज्यात युती सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वच सणावरील निर्बंध हटले असल्यामुळेच आज महावीर जयंतीनिमित्त निघणारी रथयात्रा देखील त्याच उत्साहात निघत असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार असून यापुढेही सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी ते कटिबद्ध असेल, असेही यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप प्रदेश सचिव संदीप लेले आणि श्री ठाणा जैन महासंघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -