घरमहाराष्ट्रमुंबईतील कचऱ्यामुळे अलिबागच्या कांदळवनातील जैवविविधतेला धोका

मुंबईतील कचऱ्यामुळे अलिबागच्या कांदळवनातील जैवविविधतेला धोका

Subscribe

मुंबईच्या समुद्रातून वाहून येणारा कचरा हा अलिबागच्या कांदळवनात दिसून येतो, ज्यामुळे जैवविविधता धोक्यात येत आहे. तसेच दिवसेंदिवस या कचऱ्याचे प्रमाण वाढत चालले असून याला आळा घालणे गरजेचे होत चालले आहे.

मुंबई जितकी बाहेरून दिसायला सुंदर आहे. तितकीच मुंबईच्या पोटात कचऱ्याचे साम्राज्य हे वाढत चाललेले आहे. पण मुंबईतील या कचऱ्यामुळे अलिबागमध्ये असलेल्या कांदळवनातील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. मुंबईतील समुद्रात दररोज लाखो टन कचरा मुंबईकरांकडून किंवा मुंबईत येणाऱ्या पर्यटकांकडून फेकला जातो. प्लास्टिकच्या पिशव्या, काचेच्या बाटल्या, सॅनिटरी पॅडचा कचरा, कपडे, धातू असा विविध कचरा हा मुंबईच्या समुद्रावरून वाहून अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर जातो. त्यानंतर हा कचरा अलिबागच्या मांडवा, सासवणे, वरसोली या समुद्र किनाऱ्यावर वाहून जातो आणि तिथेच साचून राहतो. ज्यामुळे आता अलिबागच्या समुद्रातील सागरी जीवांच्या अन्नसाखळीत बाधा येत असून यामुले मत्स्य दुष्काळाचे संकट निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्याला २४० किलोमीटर इतका विस्तृत समुद्र किनारा लाभला आहे. दरवर्षी अनेक पर्यटक हे या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. परंतु, बहुतेक वेळा या पर्यटकांकडूनच या निसर्गरम्य असलेल्या समुद्र किनाऱ्यांवर कचरा टाकला जातो. त्यामुळे देखील या समुद्र किनारे देखील विद्रूप होऊ लागले आहेत. तर मुंबईच्या समुद्रातून वाहून येणारा कचरा हा कांदळवनात दिसून येतो, ज्यामुळे जैवविविधता धोक्यात येत आहे. तसेच दिवसेंदिवस या कचऱ्याचे प्रमाण वाढत चालले असून याला आळा घालणे गरजेचे होत चालले आहे.

- Advertisement -

दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अलिबाग समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी, या समुद्र किनाऱ्यावरील कचरा गोळा करण्यासाठी एक आधुनिक यंत्र दिले आहे. या यंत्राच्या साहाय्याने दर आठवड्याला किनाऱ्यावरील कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे.

तर मुंबईत देखील शिल्लक राहिलेल्या कांदळवनांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येते. त्यामुळे पाऊस सुरू होण्याच्या आधी जेव्हा मुंबईतील किनारपट्टी भागात असलेल्या खाड्यांमधून गाळ काढण्यात येतो, तेव्हा देखील हजारो टन कचरा बाहेर काढण्यात येतो.

- Advertisement -

हेही वाचा – साईबाबांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी धीरेंद्र शास्त्रींविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -