घरठाणेठाणे ग्रामीण भागात १ लाख २० हजार ७५२ बालकांना पोलिओ डोस

ठाणे ग्रामीण भागात १ लाख २० हजार ७५२ बालकांना पोलिओ डोस

Subscribe

जिल्हयात आज सुमारे ८९ टक्के पोलिओ लसीकरण

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रात रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत पाच वर्षापर्यंतच्या १ लाख २० हजार ७५२ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. जिल्हयात आज सुमारे ८९ टक्के पोलिओ लसीकरण झाले. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना आजपासून घरोघरी जाऊन पोलिओ डोस देण्यास सुरुवात झाली, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले.
जिल्हास्तरीय पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते शहापूर तालक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र सापगाव येथे झाला. यावेळी आरोग्य सभापती वंदना भांडे, जिल्हा परिषद सदस्य तरमाळे, निलेश  भांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अंबरनाथ , कल्याण , शहापूर, भिवंडी व मुरबाड तालुक्यात तसेच बदलापूर व अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात  मोहिम राबविण्यात आली. जिल्ह्यात सुमारे १८३१ बुथच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यात पोलिओ डोससाठी अपेक्षित लाभार्थी बालकांची संख्या १ लाख ३७ हजार १२० एवढी आहे त्यापैकी आज १ लाख २० हजार ७५२ बालकांना डोस पाजण्यात आला उर्वरित बालकांना  पुढील तीन ते पाच दिवसांमध्ये आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन पोलिओचे डोस देणार असल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांनी सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -