घरताज्या घडामोडीसंशयाची सुई अदानी उद्योगाकडे आठ दिवसांनंतरही जेएनपीटी विस्कळीत

संशयाची सुई अदानी उद्योगाकडे आठ दिवसांनंतरही जेएनपीटी विस्कळीत

Subscribe

देशातील सर्वात मोठ्या जेएनपीटी या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बंदरावरील सायबर हल्ल्यातून हे बंदर अद्याप सावरलेले नाही. बंदरावरील सायबर हल्ल्याची तीव्रता लक्षात घेता मालाची चढ-उतार रुळावर यायला बुधवार उजाडेल, असा अंदाज व्यक्त केला जात असून, यामुळे विदेशातून आलेल्या कंटेनरने भरलेल्या जहाजांनी अरबी समुद्रात एकच गर्दी केली आहे. या सायबर हल्ल्यामुळे जेएनपीटीचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे देशात इतर बंदरात हातपाय पसरलेल्या बंदरांवर या हल्ल्याचा कोणताही परिणाम न जाणवल्याने जेएनपीटीच्या खासगीकरणाच्या स्पर्धेत उतरलेल्या अदानी उद्योगाकडे संशयाने पाहिले जात आहे.

जेएनपीटी या आंतररारष्ट्रीय स्तरीय कंटेनर टर्मिनलवर मंगळवारी हा सायबर हल्ला करण्यात आला. यामुळे बंदरातील कारभार पुरता रोखला गेला आहे. एकीकडे सरकारी बंदरावर हा हल्ला झाला असताना इतर खासगी बंदरांमधील मालाची देवाणघेवाण सुरू असल्याने खासगी बंदर उद्योगांकडे संशयाची सुई वळली आहे. जेएनपीटी बंदराच्या खासगीकरणासाठी नुकत्याच निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत डी.पी.वर्ल्ड आणि अदानी बंदर व्यवस्थापनाने भाग घेतला आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच हा हल्ला झाल्याने बंदर कर्मचार्‍यांनी याच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. बंदराचे कामकाज ठप्प झाल्याने विदेशातून माल घेऊन आलेल्या कंटेनर जहाजांनी अरबी समुद्रात गर्दी केली आहे.

- Advertisement -

जेएनपीटी बंदरात गेटवे टर्मिनल इंटरनॅशनल टर्मिनल, न्हावा-शेवा इंटरनॅशन टर्मिनल, गेटवे टर्मिनल इंडिया, भारत मुंबई कंटेनर टर्मिनल या खासगी बंदरांचेही काम चालते. मात्र, या बंदरांवर हल्ल्याचा फारसा परिणाम झाला नाही. हा हल्ला एकट्या जेएनपीटीवरच झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या खासगी बंदरांच्या व्हेसल ऑपरेशनची जबाबदारी ही जेएनपीटीची असल्याने तितका काय तो परिणाम या बंदरांना सोसावा लागला. हे संकट दूर करण्यासाठी बंदरातील संगणक विभाग जिकीरीने कामाला लागले आहे. मात्र, तरीही हे संकट बुधवारपर्यंत संपण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले.

‘हॅना’ने वाचवले?
दरम्यान असे हल्ले परतवण्याकरता बंदराने हॅना नामक यंत्रणा बंदरात विकसित केली आहे. हल्ला झाला तेव्हा ही यंत्रणा कार्यान्वित होती. मात्र, हल्लाच इतका जबर होता की यामुळे संगणकाचे स्क्रीन बंद पडले. परिणामी बॉक्स्टर मेल उघडता आले नाहीत. या मेलची म्यॅन्यूअल पध्दतीने नोंदी घेण्याची वेळ ऑपरेशन विभागावर आली. या हल्ल्यामुळे बंदरातील जहाजांवरही गंभीर परिणाम दिसून आले असते. मात्र, हॅना यंत्रणेमुळे हे संकट दूर झाल्याची माहिती एका तज्ज्ञाने या प्रतिनिधीला दिली.

- Advertisement -

गुन्हे दाखल
जेएनपीसीवरील हल्लेखोर हॅकर्सचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्याने गेटवे टर्मिनल्स इंडिया ऑपरेट करणार्‍या मालरमर्सेक कंपनीची संगणकीय यंत्रणा निकामी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -