घरठाणेकळवा रुग्णालयात भोंगळ कारभार सुरुच; 3 वर्षीय चिमुकलीच्या पायातील 'त्या' भागात अडकली...

कळवा रुग्णालयात भोंगळ कारभार सुरुच; 3 वर्षीय चिमुकलीच्या पायातील ‘त्या’ भागात अडकली गाईड वायर

Subscribe

ठाणे : कळवा रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वी एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यु झाल्याने खळबळ उडाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा कळवा रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर आला आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या एका 3 वर्षीय चिमुकलीच्या पायातील जांघेत गाईड वायर (सुई) अडकल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. धक्कादायक म्हणजे तिच्या जांघेत अडकलेली गाईड वायर काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. मात्र ही शस्त्रक्रिया कळवा रुग्णालयात होऊ शकत नाही. कारण रुग्णालयात कार्डीअ‍ॅक सर्जनच नाही. त्यामुळे चिमुकलीला मुंबईतील जेजे रुग्णालयात हलविण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. (Poor administration continues at Kalwa Hospital A guide wire stuck part of a 3 year olds leg)

ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. मात्र दोन महिन्यापूर्वी म्हणजेच ऑगस्ट 2023 रोजी एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यु झाल्यानंतर कळवा रुग्णालय अधिकच चर्चेत आले होते.  या प्रकरणाचा अहवाल सादर होऊन कारवाई होणे अपेक्षित होते, मात्र अद्यापही अहवाल शासनाकडून सादर झालेला नाही. त्यामुळे कळवा रुग्णालयातील भोंगळ कारभाराचा 3 वर्षीय चिमुकलीला फटका बसला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अविनाश भोसलेंची शनिवारी जे. जे. मध्ये एमआरआय चाचणी

3 वर्षीय चिमुकली निमोनिया या आजारामुळे साधारणपणे एक महिन्यापूर्वी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. त्यावेळी तिची जास्तच प्रकृती खालावल्याने तिला व्हेंटिलेटर ठेवण्यात आले होते. यावेळी तिला सलाईन लावायची होती, मात्र हाताची नस सापडत नसल्याने डॉक्टरांनी तिच्या पायाची नस धरून त्याद्वारे तिच्यावर उपचार सुरू केले. मात्र असे केल्यानंतर तिच्या पायाच्या जांघेत गाईड वायर अडकली आणि ती अद्यापही काढता आलेली नाही.

- Advertisement -

गाईड वायर रुग्णांच्या शरीरात राहिल्यास कोणताही धोका नाही

कळवा रुग्णालयाचे डॉ. अनिरुद्ध माळगावकर म्हणाले की, तिची प्रकृती नाजूक असल्याने तिच्या पायातील गाईड वायर काढता येणे आमच्यासाठी शक्य नव्हते. कारण गाईड वायर सरळ असते, परंतु माणसाच्या अंगातील नसा सरळ नसतात. त्यामुळेच कदाचित हा प्रकार घडला असावा, असा दावा करताना त्यांनी म्हटले की, ही गाईड वायर रुग्णांच्या शरीरात एक ते दीड महिना राहिल्यास काहीची धोका पोहोचत नाही. ही गाईड वायर चिमुकलीच्या शरीरातून काढण्यापेक्षा तिचा जीव वाचवणे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. त्यानुसार तिच्यावर योग्य उपचार करण्यात आले. त्यामुळे चिमुकली व्हेंटीलेटवर आणि ऑक्सिजन शिवाय श्वासोच्छ्वास घेत असल्याची माहिती डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली.

हेही वाचा – मतदार नोंदणीकडे तरुणांनी फिरवली पाठ; निवडणूक अधिकाऱ्यांकडून धक्कादायक माहिती उघड

रुग्णालयात कार्डिएक सर्जन नसल्याचे माळगावकरांकडून मान्य

डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी त्या चिमुकलीच्या शरीरात अडकलेली गाईड वायर काढण्यासाठी रुग्णालयात इंटरव्हेशनल कार्डिएक सर्जन व इतर तज्ञ्ज नसल्याचे मान्य केले आहे. त्यांनी असेही म्हटले की, चिमुकलीच्या जांगेतून वायर काढण्यासाठी तिला जेजे रुग्णालयात पाठवावे लागणार असल्याची कल्पना तिच्या पालकांना दिली आहे.

जितेंद्र आव्हाडांकडून ट्वीट

याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी ट्वीट करताना रुग्णालयाच्या कारभारावर टिका केली आहे. त्यांनी म्हटले की, ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये 16 दिवस झाले ठाण्यातील एका मुलीच्या जांघेमध्ये इंजेक्शन देत असताना सुई तुटली. आज 16 दिवसानंतरही सुई तिथेच आहे. कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. ती सुई काढण्यासाठी लहानशी सर्जरी करावी लागेल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु त्यासाठी रुग्णालयामध्ये डॉक्टरही नाहीत. आता त्या मुलीचा पाय सुजायला लागला आहे. जर त्याच्यात काही बरेवाईट झाले तर त्या मुलीचा पाय कापावा लागेल. इतका निष्काळजीपणा डॉक्टर्स कसे काय करू शकतात आणि मुख्य म्हणजे इंजेक्शन देत असताना सुई तुटतेच कशी? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -